पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी भारतीय हॉकी संघ जाहीर

    दिनांक :26-Jun-2024
Total Views |
नवी दिल्ली, 
Indian Hockey Team हॉकी इंडियाने अखेर पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी 16 सदस्यीय भारतीय पुरुष संघाची घोषणा केली आहे. आगामी ऑलिम्पिक स्पर्धा 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान होणार आहेत. या संघाचे कर्णधारपद अनुभवी खेळाडू हरमनप्रीत सिंग सांभाळणार असून तो तिसऱ्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. हार्दिक सिंगची संघाच्या उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. २०२० मध्ये टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघाने कांस्यपदक जिंकले होते. या संघात समाविष्ट असलेल्या इतर खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर 6 खेळाडू असे आहेत ज्यांना पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे.
 
 
hocky
पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी जाहीर झालेल्या भारतीय हॉकी संघात अनुभवी खेळाडू पीआर श्रीजेश गोलरक्षकाची जबाबदारी सांभाळेल, तर मनप्रीत सिंग मिडफिल्डर असेल. कर्णधार हरमनप्रीत सिंगशिवाय बचाव संघात जर्मनप्रीत सिंग, अमित रोहिदास, सुमित आणि संजय या खेळाडूंचा समावेश आहे. अभिषेक, सुखजित सिंग, ललित कुमार उपाध्याय आणि गुरजंत सिंग यांच्या नावाचा फॉरवर्ड खेळाडूंमध्ये समावेश आहे. Indian Hockey Team टीम इंडियाला आगामी ऑलिम्पिक गेम्समध्ये पूल बी मध्ये स्थान मिळाले आहे, ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, न्यूझीलंड आणि आयर्लंड या संघांव्यतिरिक्त बेल्जियमच्या संघाचा समावेश आहे ज्याने गेल्या वेळी सुवर्णपदक जिंकले होते. भारतीय संघ 27 जुलैला न्यूझीलंडविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. यानंतर 29 जुलैला संघाचा सामना अर्जेंटिनाशी होणार आहे. त्यानंतर भारताचा सामना 30 जुलैला आयर्लंडशी, 1 ऑगस्टला बेल्जियम आणि 2 ऑगस्टला ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.
गोलरक्षक – पीआर श्रीजेश.
बचावपटू - जर्मनप्रीत सिंग, अमित रोहिदास, हरमनप्रीत सिंग, सुमित, संजय.
मिडफिल्डर - राजकुमार पाल, शमशेर सिंग, मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, विवेक सागर प्रसाद.
फॉरवर्ड - अभिषेक, सुखजित सिंग, ललित कुमार उपाध्याय, मनदीप सिंग, गुरजंत सिंग.
पर्यायी खेळाडू - नीलकांत शर्मा, जुगराज सिंग, कृष्ण बहादूर पाठक.