दुहेरी भूमिकेत सीमा द्विवेदी !

30 Jun 2024 15:00:43
 नेत्री
- शायना एन.सी.
 
Seema Dwivedi MP डोळ्यांत सुकलेले अश्रू, कोपऱ्यात ठेवून दिलेला केक आणि आई...आई असा मुसमुसत झोपलेला मुलगा ! ‘घेतले न व्रत हे आम्ही अंधतेने' म्हणत समाजसेवेच्या व्रताचा फुललेला निखारा पदरात घेऊन मार्गक्रमण करताना, असे अनुभव तर येणारच. पण, त्या अनुभवांतूनच राष्ट्रप्रेमी पिढी घडते, असा विश्वास सीमा द्विवेदी व्यक्त करतात. Seema Dwivedi MP आत्मनिर्भर आणि स्वतंत्र महिला ही आज समाजाची नवी ओळख आहे. ‘आकांक्षांपुढती गगन ठेंगणे' ही उक्ती सार्थ ठरविणाऱ्या महिला सर्वांसाठी आदर्श आणि प्रेरणादायी ठरत आहेत. असं एक नाव म्हणजे उत्तर प्रदेशातून राज्यसभेच्या खासदार झालेल्या सीमा द्विवेदी!Seema Dwivedi MP
 
 

Seema Dwivedi MP 
 
 
Seema Dwivedi MP सीमा द्विवेदी यांचा जन्म ११ मार्च १९७२ रोजी उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील भोईला गावात उपाध्याय कुटूंबात झाला. त्यांनी स्नातकोत्तर पदवी शिक्षण जौनपूरमधून पूर्ण केलं. ३० मे १९९१ रोजी डॉ. अरुणकुमार द्विवेदी यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. ते बनारस हिंदू विद्यापीठात प्राध्यापक होते. विवाहानंतर त्या १९९५ मध्ये राजकारणात आल्या आणि जिल्हा पंचायतीच्या सदस्य बनल्या. त्यानंतर, गढवाला विधानसभा क्षेत्रातून आमदार म्हणून निवडून गेल्या. वर्ष २०२० मध्ये त्या प्रथम राज्यसभेच्या खासदार झाल्या. Seema Dwivedi MP वडील राजकारणात सक्रीय होते पण, सासरी कोणी राजकारणात नव्हतं. त्या सांगतात, सुट्यांमध्ये आम्ही गावी गेलो होतो.
 
 
 
त्यावेळी, निवडणुका लागणार होत्या आणि ती जागा महिलांसाठी राखीव होती. पण, कोणी महिला तयार नव्हती. मी नवीन सून...मला कोण ओळखणार? पण, स्थानिक नेतेमंडळींनी माझ्या पतींना विचारलं की, सीमा निवडणूक लढवेल का? ते म्हणाले, हो...का नाही! माझे वडील खूप शिस्तप्रिय होते.' Seema Dwivedi MP मला वाटलं, ते रागावतील. पण, मी त्यांना भेटायला गेले, नमस्कार केला आणि सांगितलं की, जिल्हा परिषदेची निवडणूक लढवतेय. ते म्हणाले, छान! पण, नुसती लढवायची म्हणून लढू नकोस तर जिंकण्यासाठी लढ! त्यांच्या शब्दांनी मला बळ आलं. ती निवडणूक मी जिंकले आणि माझा राजकीय प्रवास सुरू झाला.'
 
 
 
Seema Dwivedi MP सुरुवातीला नामांकन अर्ज कसा भरायचा? प्रचार कसा करायचा? काहीच माहिती नाही. पण, कुटूंबाच्या सहकार्याने हा प्रवास शक्य झाल्याचं त्या सांगतात. मुलांना सांभाळण्यापासून सगळं सहकार्य कुटुंबियांनी केलं. मी देखील कधी आमदार म्हणून टेचात वावरले नाही. घरी आल्यावर मी गृहिणी आणि बाहेर असताना राजकारणी अशी दुहेरी भूमिका मी निभावली. पण, हे कुटूंबाच्या पाठींब्याशिवाय शक्य नसल्याचं सीमा सांगतात. सासर आणि माहेरचा पाठींबा असेल तर कोण काय म्हणतं, याची पर्वा करण्याची गरज नाही. Seema Dwivedi MP महिलांवर पुरुषांची अभद्र टिप्पणी होणं, हे मागास मानसिकतेचं लक्षण आहे. त्यात सुधारणेला बरीच संधी आहे, असं त्या म्हणतात. त्यांनी गावात रहात असतानाचा एक अनुभव सांगितला. ‘मला सायकल चालविण्याचा खूपच छंद होता. आमच्या एक आत्याबाई होत्या. त्या मला नेहमी चिडवायच्या की, तुझं लग्न होईल तेव्हा तुला दोन सायकली द्याव्या लागतील. एक तुला आणि दुसरी जावईबापूंना!' यावर सगळ्या हसायच्या.
 
 
 
Seema Dwivedi MP त्यामुळे, अशा टीकेकडे दुर्लक्ष करून युवतींनी सक्रीय राजकारणात यावं आणि स्वत:ची स्वप्नं पूर्ण करावीत, असं मला वाटतं,' सीमा मोकळेपणाने सांगतात. लोकांचा विश्वास जिंकणं, हा राजकारणाचा मूलमंत्र आहे, असं त्या म्हणतात. लोकांच्या गरजेच्या वेळी धावून जाण्यासह, रस्ते-वीजपुरवठा, पाणी आणि शिक्षणाच्या सोयी करण्यावर बहुतांश आमदार निधी खर्च केला. याचं मुख्य कारण की, घरात वीजपुरवठा नसला की, काय त्रास होतो, हे मी स्वत: भोगलं होतं. Seema Dwivedi MP त्यामुळे मला त्याचे गांभीर्य होते आणि आहे. हॅण्डपंप लावण्यासह पथदिवे लावण्यावर आम्ही विशेषत्वाने कार्य केल्याचं त्या सांगतात. अभ्यासपूर्ण मुद्दे, भाषणांची आखणी, शिकण्याची संधी राज्यसभेत मिळते. आपलं राज्य आणि आपल्या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करताना जबाबदारीची जाणीव होते, असं त्या सांगतात. मुली-महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या प्रकरणात मुलींना दोष देण्यापेक्षा आपल्या मुलांवर संस्कार करण्याची जास्त गरज त्यांनी प्रतिपादीत केली.
शब्दांकन : रेवती जोशी-अंधारे 
Powered By Sangraha 9.0