कृषी निविष्ठांसाठी सुविधा द्यावी

30 Jun 2024 19:01:21
मुनगंटीवार यांचे केंद्रीय रेल्वेमंत्री वैष्णव यांना पत्र
तभा वृत्तसेवा
चंद्रपूर, 
जिल्ह्यातील चंद्रपूर, agricultural benefits मूल आणि ताडाळी रेल्वे स्थानकावर कृषी निविष्ठांसाठी स्वतंत्र प्लॅटफॉर्म, शेड आणि गोदामाची व्यवस्था करावी, अशी विनंती राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्राद्वारे केली.चंद्रपूर हा महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेला जिल्हा आहे. देशाच्या चारही दिशांनी जाणार्‍या सर्व रेल्वे गाड्यांसाठी चंद्रपूर हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे. 
 
sudhir mungantiwar
त्यातच शेतकर्‍यांची agricultural benefits संख्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असून, विविध प्रकारच्या कृषी निविष्ठा, बी-बियाणे, खते तसेच रेल्वेद्वारे मोठ्या प्रमाणात जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक होते. जिल्ह्यातील चंद्रपूर, मूल आणि ताडाळी रेल्वे स्थानकावर कृषी निविष्ठाचे अवागमन आणि खतांचा साठा चांगल्या प्रकारे जतन करून ठेवण्यासाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे खते आणि बियाणांची नासाडी तसेच कृषी विषयक साहित्य सुस्थितीत ठेवण्यास अनेक अडचणी निर्माण होत आहे. याचा परिणाम जिल्ह्यातील शेतकरी तसेच कृषी क्षेत्रावर होत आहे. रेल्वेने आलेले कृषी विषयक साहित्य, खते, बियाणे आदी बाबी रेल्वे स्थानकावर उतरविल्यानंतर त्याचा पुरवठा जिल्ह्यात इतरत्र केला जातो. त्यासाठी चंद्रपूर, मूल आणि ताडाळी येथील रेल्वे स्थानकावर स्वतंत्र प्लॅटफॉर्म, पावसापासून कृषी निविष्ठांचा बचाव करण्यासाठी उत्तम शेड आणि साठवणुकीसाठी गोडावूनची आवश्यकता आहे. या सोयीसुविधा येथे उपलब्ध करून दिल्या तर खते आणि बियाणे वाहतुकीदरम्यान वाया जाणार नाही तसेच त्यांची नासाडी सुद्धा वाचेल. सोबतच जिल्ह्यासाठी एक उत्कृष्ट पुरवठा साखळी निर्माण होऊन त्याचा फायदा लाभार्थी आणि कृषी क्षेत्राला होण्यास मदत मिळेल, अशी मागणी मुनगंटीवार यांनी वैष्णव यांना या पत्रातून केली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0