शेतकर्‍यांना 50 हजारांचे अनुदान

30 Jun 2024 17:59:33
-शेतकरी कर्जमुक्ती योजना
 
अकोला,
राज्याच्या farmers debtfree scheme महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजने अंतर्गत 50 हजाराचे अनुदान शेतकर्‍यांना त्वरित वाटप करण्यात येईल, अशी घोषणा राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात करण्यात आली असून आता याचा लाभ जिल्ह्यातील लाभाच्या प्रतिक्षेत असलेल्या 778 शेतकर्‍यांना मिळणार आहे.
 
 

farmers debtfree scheme 
सन 2014 ते 2019 मधील farmers debtfree scheme तत्कालीन भाजप-शिवसेना सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफि सन्मान योजना जाहीर केली होती. पण यातील विचित्र अटींमुळे शेतकरी संत्रस्त झाले होते. महाविकास आघाडीचा बेताल कारभार संपल्यावर नव्याने सत्तारूढ झालेल्या शिंदे-फडणवीस सरकाराने हे अनुदान जाहीर करण्याचा निर्णय घेतला. आता शुक्रवार 28 जूनच्या अतिरिक्त अर्थसंल्पातही ही घोषणा करण्यात आली. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील 20,481 शेतकर्‍यांना 89 कोटी 37 लाखांचे अनुदान देण्यात आले. इतकेच नव्हे तर 35,627 खाते अपलोड करण्यात आले. सध्या 21,259 शेतकर्‍यांच्या प्रकरणांना विशिष्ट क्रमांक देण्यात आला असून, हे प्रकरण पात्र ठरले आहेत. ई केवायसी प्रलंबित असलेल्या प्रकरणांची संख्या 594 आहे. आता अर्थसंकल्पातील घोषणेमुळे अन्य शेतकर्‍यांना अनुदान मिळण्यासाठीची प्रक्रिया वेग घेणार आहे.
Powered By Sangraha 9.0