‘पृथ्वी उदया’चे छायाचित्र टिपणारे बिल अँड्रेस अपघातात ठार

08 Jun 2024 18:26:05
वॉशिंग्टन, 
नासाच्या अपोले 8 मोहिमेतील अंतराळवीर Bill Andres बिल अँड्रेस यांचा अपघातात मृत्यू झाला. एका विमान अपघातात वयाव्या 90 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला, अशी माहिती त्यांचा मुलगा ग्रेग यांनी दिली आहे. अंतराळवीर बिल अँड्रेस उड्डाण करीत असलेले एक छोटे विमान वॉशिंग्टन राज्याच्या समुद्रात कोसळले आणि हा भीषण अपघात झाला, असे अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
 
 
Bill Andres
 
अँड्रेस यांचा मुलगा ग्रेग यांनी शुक्रवारी दुपारी वडिलांचा मृतदेह सापडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. यावेळी कुटुंबाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात, Bill Andres बिल अँड्रेस यांच्या मृत्यूने आमचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. ते एक उत्तम वैमानिक होते. त्यांची उणीव नेहमीच भासणार आहे, असे म्हटले आहे. बिल अँड्रेस नासाच्या अपोलो 8 मोहिमेवरील वैमानिक होते. या मोहिमेदरम्यान त्यांनी पृथ्वी उदयाचे प्रसिद्ध छायाचित्र टिपले होते. जे अंतराळातून टिपलेल्या पृथ्वीच्या सर्वांत संस्मरणीय आणि प्रेरणादायी छायाचित्रांपैकी एक आहे.
Powered By Sangraha 9.0