सीपीईसी प्रकल्पाच्या विस्तारीकरणावर सहमती

08 Jun 2024 21:43:49
- शाहबाज यांनी घेतली जिनपिंग यांची भेट
 
इस्लामाबाद, 
CPEC project : बलुचिस्तान प्रांताच्या ग्वादर बंदर ते चीनच्या शिनजियांग प्रांताला जोडणार्‍या आर्थिक कॉरिडॉर (सीपीईसी) प्रकल्पाच्या दुसर्‍या टप्प्याच्या विस्तारीकरणाचे काम सुरू करण्यासंदर्भात पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ व राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यात सहमती झाली आहे. शाहबाज चीनच्या पाच दिवसीय दौर्‍यावर होते. यावेळी त्यांनी जिनपिंग यांची भेट घेऊन प्रकल्पाच्या कामाला गती देण्यावर चर्चा केल्याची माहिती पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाने दिली आहे.
 
 
zinping
 
CPEC project : चीनने सीपीईसी प्रकल्पासाठी 65 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. यात विविध वीजनिर्मिती प्रकल्प, रस्त्यांचे बांधकामासह विकास व सुविधा निर्माण करणे आहे. मात्र, मागील काही महिन्यांपासून प्रकल्पाचे काम रखडले होते. प्रकल्पाला वेग देण्यासाठी शाहबाज यांनी प्राधान्य दिले असून, त्यासंदर्भात जिनपिंग यांच्याशी झालेल्या बैठकीत चर्चा केली. या प्रकल्पामुळे आर्थिक विकासाला वेग, औद्योगिक विकास, शेतीचे आधुनिकीकरणास मदत होणार असल्याचे पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले. दोन्ही नेत्यांमध्ये यावेळी व्याप्त काश्मीरसह अपफगाणिस्तान, पॅलिस्टाईन, दक्षिण आशियासह क्षेत्रीय आणि जागतिक मुद्दांवर चर्चा झाली. 2015 मध्ये जिनपिंग यांनी पाकिस्तानचा दौरा केला होता. त्यावेळी सीईसी प्रकल्पावर औपचारिक चर्चा झाली होती. पंतप्रधानपदानंतरचा शाहबाज यांचा चीनमधील हा पहिलाच दौरा आहे.
Powered By Sangraha 9.0