मर्द मराठा वीर शिवाजी, अवतरले जगती...

    दिनांक :08-Jun-2024
Total Views |
- खंजेरी भजनसंध्येने उपस्थितांची मने जिंकली

पुसद, 
गड कोंढाणा काबीज केला,
वीर तानाजी स्वर्गी गेला,
तुकड्यादास म्हणे हळहळला,
भगवा गडावरती,
मर्द मराठा वीर शिवाजी,
अवतरले जगती, शिवाजी अवतरले जगती...
हे पुण्याजवळील कोंढाणा (सिंहगड) किल्ल्याची महती सांगणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रचित भजन मंडळाचे प्रचारक किसन गरडे यांनी खड्या आवाजात सादर करून वातावरणात स्फूर्ती जागविली. निमित्त होते, स्थानिक गुरुदेव सेवा मंडळ आयोजित Chhatrapati Shivaji Maharaj छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळा कार्यक्रमाचे.
 
 
y8Jun-Pusad-Maratha
 
स्थानिक देशमुखनगरमधील मंडळाच्या सर्वधर्मीय सामुदायिक प्रार्थनास्थळी आयोजित या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष प्रा. प्रकाश लामणे होते. यावेळी मंडळाचे कार्याध्यक्ष प्रा. नंदकुमार खैरे, सचिव अ‍ॅड. गजानन साखरे, डॉ. शरद राऊत, प्रा. शंकर दंडारे उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
 
 
Chhatrapati Shivaji Maharaj : त्यानंतर सर्वधर्मीय सामुदायिक प्रार्थना, ग्रामगीता ग्रंथाचे वाचन व जयघोष करण्यात आला. याप्रसंगी गुरुदेव अनुयायांनी राष्ट्रसंतांची एकापेक्षा एक सरस अशी खंजेरी भजने साग‘संगीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी प्रा. नंदकुमार खैरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाजोपयोगी, प्रेरणादायी व लोककल्याणकारी कार्याचा आढावा घेतला. अध्यक्षीय समारोप करताना प्रा. प्रकाश लामणे यांनी छत्रपती शिवराय हे सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असल्याचे सांगून छत्रपतींचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून जगण्याचे आवाहन केले. कार्यक‘मासाठी मंडळाचे सुरेश कदम, माधव जाधव, अनिल अस्वार, यशवंत देशमुख, शिवशंकर नागरे, बाबासाहेब वाघमारे, विठ्ठल येवले, विठ्ठल ढोणे, श्यामराव देशमाने, लक्ष्मण कदम, छाया लामणे, संध्या पवार, पूजा देशमुख, विमल वाघमारे यांनी पुढाकार घेतला. यावेळी पुसद शहर परिसरातील गुरुदेव प्रेमी मोठ्या सं‘येने उपस्थित होते.