हमासच्या ताब्यातून चार ओलिसांची सुटका

08 Jun 2024 20:54:07
- इस्त्रायलच्या संरक्षण मंत्रालयाची माहिती
 
जेरुसलेम, 
Israel and Hamas War : हमासच्या बंदिवासात असलेल्या चार इस्रायली नागरिकांची मध्यवर्ती गाझापट्टीतून विशेष मोहीम राबवून सुटका करण्यात आल्याची माहिती इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. नोआ अर्गामनी, अल्मोग मीर जान, आंद्रे कोझलोव्ह आणि स्लोमी झिव्ह अशी सुटका करण्यात आलेल्या ओलिसांची नावे आहे.
 
 
Israel and Hamas War
 
7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासच्या अतिरेक्यांनी इस्त्रायलवर हल्ला केला होता. यावेळी या चौघांचे अपहरण त्यांना ओलिस ठेवेल होते. ओलिसांच्या सुटकेसाठी इस्रायल पोलिसांनी नुसीरतच्या मध्यभागी असलेले दोन ठिकाणी शिन बेट आणि यमाम बि‘गेडने विशेष शोधमोहीम राबवली. त्यानंतर शुक‘वारी चार ओलिसांची सुटका करण्यात यश मिळाले. त्यांची प्रकृती सदृढ असून, पुढील वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना शेबा टेल-हाशोमर मेडिकल सेंटरमध्ये हलवण्यात आले.
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांचा दौरा
Israel and Hamas War : अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन सोमवारपासून इजित, इस्रायल, जॉर्डन आणि कतारच्या दौर्‍यावर जाणार आहे. अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी सांगितले की, या दौर्‍यात अँटोनी युद्धविराम करारावर पोहोचण्याच्या गरजेवर चर्चा करतील. या माध्यमातून मानवतावादी मदत वाढेल आणि पॅलेस्टिनींना त्यांच्या मायदेशी परत जाण्याची परवानगी मिळेल.
 
 
 
युद्धबंदीवर एकमत नाही
इस्रायल व हमास या दोघांनीही युद्धबंदीसाठी नवीन प्रस्तावाला अद्याप सहमती दिलेली नाही. सहा आठवड्यांसाठी संपूर्ण युद्धविराम आणि दुसर्‍या टप्प्यात कायमस्वरूपी युद्धविराम करण्याचे आवाहन अमेरिकेने केले आहे. युद्धबंदी आणि अतिरेक्यांनी ताब्यात ठेवलेल्यांची सुटका करण्यासाठी कतार, अमेरिका आणि इजिप्त अनेक महिन्यांपासून इस्रायल आणि हमासमध्ये मध्यस्थी करीत आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही.
Powered By Sangraha 9.0