पाच वर्षांचा ‘रोडमॅप’ तयार

09 Jun 2024 17:53:14
- नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
- शपथविधीपूर्वी खासदारांची बैठक
 
नवी दिल्ली, 
शपथविधी सोहळ्यापूर्वी Narendra Modi नरेंद्र मोदी यांनी रविवारी संभाव्य मंत्र्यांची एक बैठक घेतली. पाच वर्षांचा रोडमॅप तयार असून, 2047 पर्यंत देशाला विकसित करायचे आहे, असे त्यांनी चहापानासाठी आमंत्रित केलेल्या संभाव्य मंत्र्यांना सांगितले. 100 दिवसांचा रोडमॅप तयार करून त्यावर तुम्ही अंमलबजावणी करा, असे मोदी यांनी उपस्थित खासदारांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. 100 दिवसांचा अजेंडा प्रत्यक्षात आणा तसेच प्रलंबित योजना पूर्ण करा. तुम्हाला जे मंत्रालय मिळेल. त्यातील कामे लवकरता लवकर पूर्ण होतील याची काळजी घ्यावी, असे त्यांनी खासदारांना सांगितले.
 
 
Modi
 
Narendra Modi : पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला 22 खासदार उपस्थित होते. पाच वर्षांचा रोडमॅप तयार असूून, त्यावर झोकून काम करा. 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे. नागरिकांनी रालोआवर विश्वास ठेवला आहे. तो आणखी मजबूत करायचा आहेे, असे मोदी म्हणाले. या बैठकीला नवनिर्वाचित खासदार सर्वानंद सोनोवाल, चिराग पासवान, अन्नपूर्णा देवी, मनोहरलाल खट्टर, शिवराजसिंह चौहान, भागीरथ चौधरी, किरेन रिजीजू, जितीन प्रसाद, एच. डी. कुमारस्वामी, ज्योतिरादित्य शिंदे, निर्मला सीतारामन्, रवनीत बिट्टू, अजय टमटा, राव इंद्रजित सिंह, नित्यानंद राय, जीतन राम मांझी, धर्मेंद्र प्रधान, गजेंद्रसिंह शेखावत, हर्ष मल्होत्रा, एस. जयशंकर, सी. आर. पाटील आणि कृष्णपाल गुर्जर सहभागी झाले होते.
Powered By Sangraha 9.0