ब्रेकींग...काश्मिरमध्ये भ्याड हल्ला, १० ठार!

09 Jun 2024 20:47:39
जम्मू,
 
 
terror attack-Kashmir-Jammu जम्मू-काश्मिरच्या रियासी जिल्ह्यातील शिवखोडी तीर्थस्थळावर दर्शनासाठी जात असलेल्या यात्रेकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला आहे. terror attack-Kashmir-Jammu या हल्ल्यात १० यात्रेकरूंनचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, दहशतवाद्यांची ही तीच टोळी आहे जी राजौरी, पुंछ आणि रियासीच्या भागात लपून बसली आहे.terror attack-Kashmir-Jammu
 
 
 
terror attack-Kashmir-Jammu
 
 
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यात्रेकरूंची बस शिवखोडीहून कटèयाला जात होती. दहशतवाद्यांच्या गोळीबारामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळली. terror attack-Kashmir-Jammu या अपघातात ३३ जण जखमी तर १० जण मृत्युमुखी पडले आहेत. हे यात्रेकरू स्थानिक नसून पर्यटक आहेत. दरम्यान, शिवखोडी तीर्थस्थळाची सुरक्षितता वाढविण्यात आली असून, या भागातही पोलिसांनी गस्त वाढवली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0