विरोधकांचा बोलविता धनी कोण?

10 Jul 2024 19:12:00
- अ‍ॅड. आशिष शेलार यांचा हल्लाबोल
- आरक्षण प्रश्नी सत्ताधारी आक्रमक
 
मुंबई, 
आरक्षणाच्या मुद्यावरून महाराष्ट्र पेटत राहावा, यासाठी कोण प्रयत्न करत आहे, कोणाचा फोन, मेसेज आला. यांचा बोलविता धनी कोण आहे, असा सवाल करीत भाजपा आमदार Adv. Ashish Shelar अ‍ॅड. आशिष शेलार यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मराठा आणि ओबीसी आरक्षणावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलविण्यात आली होती. दुपारपर्यंत बैठकीला जाण्याची विरोधकांची भूमिका असताना अचानकपणे संध्याकाळी विरोधकांनी या बैठकीवर बहिष्कार घातला. यामागचे कारण सभागृहाला कळले पाहिजे, अशी आक्रमक भूमिका अ‍ॅड. शेलार यांनी यावेळी सभागृहात मांडली.
 
 
 Ashish Shelar
 
मंगळवारी झालेल्या सर्वपक्षीय मराठा आक्षणाच्या बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार घातल्याने विधानसभेत विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. याबाबतचा मुद्दा भाजपा आमदार अमित साटम यांनी विधानसभेत उपस्थित केला. यावेळी त्यांनी आक‘मक होत म्हटले की, मराठा आणि ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पण विरोधी पक्षांनी बैठकीवर बहिष्कार घातला. त्यामुळे माझे त्यांना खुले आव्हान आहे की, त्यांनी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी तुमचा पाठिंबा आहे की नाही, हे सभागृहात जाहीर करावे. तसेच, मनोज जरांगे यांना विनंती आहे की त्यांनी पाहावे, विरोधकांना फक्त राजकारण करायचे आहे, त्यांना महाराष्ट्रात सलो‘याचे वातावरण बघवत नाही. त्यामुळे जरांगेंनी विरोधकांची भूमिका पाहावी, विरोधकांना मराठ्यांची काहीच पडलेली नाही, असा आरोप अमित साटम यांनी केला आहे.
 
 
यावेळी भाजपा आमदार आशिष शेलार म्हणाले की, ज्यावेळी यांना आरक्षणाच्या मुद्यावर बोलण्याकरिता बोलावले तेव्हा हे लोक का आले नाहीत. बाहेर तुम्ही वेगळी अ‍ॅक्टिंग करून दाखवता. आधी सांगता येऊ, मग नंतर असे काय होते, की तुम्ही येत नाही. दुपारपर्यंत येतो म्हणणारे अचानक का माघार घेतात? सभागृहाच्या बाहेर विरोधकांचा कोण बोलविा धनी आहे? त्यांना कोणाचा मेसेज आला म्हणून त्यांनी बैठकीवर बहिष्कार घातला? हे त्यांनी स्पष्ट करावे, असे आव्हान Adv. Ashish Shelar अ‍ॅड. शेलार यांनी यावेळी दिले.
Powered By Sangraha 9.0