एल्विश यादव पुन्हा ईडीच्या कचाट्यात!

10 Jul 2024 10:35:08
नवी दिल्ली,
Elvish Yadav ED notice प्रसिद्ध यूट्यूबर एल्विश यादवच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. पार्टीत सापाच्या विष प्रकरणी ईडीने एल्विश यादवला नवीन समन्स पाठवले आहे. ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात एल्विशला नवीन समन्स पाठवले असून त्याला 23 जुलै रोजी लखनौला चौकशीसाठी बोलावले आहे. यापूर्वी ईडीने एल्विश यादवला नोटीस देऊन 8 जुलै रोजी बोलावले होते, मात्र एल्विशने आपण परदेशात असल्याचे सांगत काही दिवसांचा वेळ मागितला होता. त्यावर आता ईडीने 23 जुलैला हजर राहण्यासाठी समन्स जारी केले आहे.
 
 
लेविस
मे महिन्यात ईडीने एल्विशविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केल्याचे वृत्त आले होते. एल्विशच्या मालकीच्या महागड्या गाड्यांच्या ताफ्याचीही ईडी चौकशी करणार असल्याचेही यावेळी समोर आले. मिळालेल्या माहितीनुसार, एल्विशवर मोठी कारवाई होऊ शकते. एल्विश यादवसोबत ईडी मोठी हॉटेल्स, Elvish Yadav ED notice रिसॉर्ट्स आणि फार्म हाऊसच्या मालकांचीही चौकशी करणार असल्याची बातमी समोर आली आहे. एल्विश यादवला नोएडा पोलिसांनी अटक केली होती. सध्या तो जामिनावर बाहेर आहे. ईडीने एल्विशवर मुसंडी मारण्याची तयारी केली आहे.
Powered By Sangraha 9.0