पाऊस आणि टक्केवारी

10 Jul 2024 04:52:12
अग्रलेख
Nagpur-Cement Road-Corruption उन्हाळा आपल्या देशाला अक्षरशः भाजून काढतो आणि पावसाळा आपल्याला चक्क धुतो...! स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानंतरही देशाची ही स्थिती आहे आणि विशेष म्हणजे शाब्दिक बुडबुड्यांच्या पल्याड कुणालाच त्याचे सोयरसुतक नाही. Nagpur-Cement Road-Corruption देशाची आर्थिक राजधानी आणि जगातील एक महत्त्वाचे शहर असलेल्या मुंबई नगरीत पावसाचा कहर हा वार्षिक कार्यक्रम. Nagpur-Cement Road-Corruption  परवाच्या रविवारी रात्रीपासून मुंबईत अडीचशे ते तीनशे मिलीमीटर पाऊस झाला आणि मुंबईची तुंबई झाली. रेल्वे ठप्प, विमाने उशिरा, रस्ते तुंबलेले, वाहतूक बंद असा सगळा प्रकार. Nagpur-Cement Road-Corruption मुंबई महानगराच्या अनेक भागांत पूर आलेला, नाले ओसंडून वाहताहेत आणि लोक सैरभैर झालेले. वाहने वाहून जात आहेत. घरे गळत आहेत, झोपड्या पडत आहेत. मुंबई काय, पुणे काय, ठाणे काय नि नागपूर काय. आपल्या सर्व महानगरांची स्थिती पावसाळ्याच्या संदर्भात तर फारच वाईट झालेली आहे. Nagpur-Cement Road-Corruption एरवी सर्वत्र नुसते काँक्रिट टाकतात. नागपुरात तर सिमेंटचे रस्ते झाले आणि आता गल्लोगल्ली काँक्रिट टाकत आहेत. कशासाठी तर म्हणे- स्मार्ट सिटीचा प्रोजेक्ट आहे. स्मार्ट सिटीमध्ये गल्ल्यांचे काँक्रिटीकरण करण्याचा शहाणपणा ज्या कुणाला सुचला असेल, त्याचे पायच धरले पाहिजे.
 
 

Nagpur-Cement Road-Corruption 
 
 
Nagpur-Cement Road-Corruption यात पावसाच्या टक्केवारीला हाताळण्यापेक्षा ठेक्याच्या टक्केवारीला अधिक महत्त्व असावे, हे कुणालाही कळते. एकीकडे जोरदार पाऊस आला तर पाणी वाहून जायला जागा राहिलेली नाही आणि दुसरीकडे कुणाला सांगायचे तर तोही मार्ग नाही. पूर्वी चौक आणि मुख्य रस्ते तुंबायचे. आता काँक्रिटच्या गल्ल्याही तुंबतील. जगभरात जाऊन पाहा. विशेषतः प्रगत देशांमध्ये जा. तिथली गावे, शहरे पाहा. रस्ते काँक्रिटचे असले तरी गावांतल्या गल्ल्या म्हणजे पेवमेंटस शक्य तितक्या साध्या, नैसर्गिक ठेवण्याचा प्रयत्न असतो. Nagpur-Cement Road-Corruption गल्ल्यांच्या आजूबाजूला हिरवळ, अशोकासारखी किंवा गुलमोहरासारखी छान झाडे, बसायला बाक असे सगळे असते. मोटारी रस्त्यावर किंवा रस्त्याच्या कडेला पार्क करणे हा अनेक ठिकाणी अपराध तर काही ठिकाणी मूर्खपणा समजतात. तसे केले तर दंड आकारला जातो. भारतात सब कुछ चलता है. गाडी कुठेही आणि कशीही पार्क करा. रस्ते कसेही बांधा, कुठेही काँक्रिट वापरा. अधिकारी, कर्मचारी, पुढारी यांना वन टू टेन-ट्वेंटी परसेंट असा वाटा मिळाला की ठेकेदारांना रान मोकळे असते.Nagpur-Cement Road-Corruption मग कामाचा दर्जा कुणी पाहत नाही आणि कुणी त्याची तक्रार करीत नाही.
 
 
 
एखाद्या सामान्य नागरिकाने तक्रार केली तर त्यालाच उलट धमकावले जाते इतकी आपली उफराटी व्यवस्था. अशा व्यवस्थेत पाऊस जोरात बरसला तर जे व्हायचे असते, तेच पुन्हा यंदाही झालेले आहे आणि ते सतत होत राहणार आहे. गेल्या अडीच वर्षांपासून महानगरपालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. Nagpur-Cement Road-Corruption त्यामुळे नगरसेवक नाहीत. माजी नगरसेवकांना अधिकार नाहीत. पूर्वी नगरसेवकांकडे लोकांना जाता येत होते. तक्रार मांडता येत होती. ते तक्रारकत्र्यांना अधिकाèयांकडे घेऊन जात. आता त्यांचे अधिकारी-कर्मचारी ऐकत नाहीत. शिवाय, त्यांच्यावर आता तशी जबाबदारी उरलेली नाही. कारण ते नगरसेवकच राहिलेले नाहीत. ते माजी झालेले आहेत. अपवाद वगळता बहुतांशी महापालिकांमध्ये ग्रंथालयांसारखा एखादाच विभाग असेल, जिथे भ्रष्टाचार होत नाही. ग्रंथालयांमध्ये पुस्तकांच्या खरेदीत कमिशन खाणारे महाभाग आहेत. तरी त्या विभागात भ्रष्टाचाराचे प्रमाण कमी आहे. Nagpur-Cement Road-Corruption बांधकाम मंजुरी, नकाशे मंजुरी, फेरफारची नोंद, जन्म-मृत्यू, आरोग्य-दवाखाने, बाजार, कर संकलन-निर्धारण, पाणीपुरवठा असा कोणताही विभाग पाहा, तिथे नागरिकांचे काम सरळ पद्धतीने झाले तर नवल वाटावे, अशी परिस्थिती आहे.
 
 
 
सर्वाधिक भ्रष्टाचार असतो बांधकाम या विषयात. अनेक ठिकाणी कोणते काम काढले पाहिजे, ते किती रकमेचे असले पाहिजे, त्याचे स्पेसिफिकेशन्स काय, त्याचे टेंडर डॉक्युमेंट हे सगळे कंत्राटदारच सुचवतो आणि तयारही करून देतो. सरकारी अधिकारी फक्त म् म् म्हणतात, टक्केवारी घेतात आणि काम मंजूर होते. Nagpur-Cement Road-Corruption त्यासाठी करावी लागणारी रिंक वगैरे हा विषय कंत्राटदार सांभाळतो. असा कंत्राटदार, जो ठेका मिळविण्यासाठी पैसा मोजतो, टक्केवारी अग्रीमात देतो, तो कोणतेही स्थापत्य किंवा सिव्हिल वर्क चांगलेच करील याची काहीही हमी नसते आणि तरीही ‘टेस्टेड ओके'चा अहवाल सादर होऊन त्याचे बिल मंजूर झालेले असते, इतकी ही व्यवस्था छान रुजलेली, रुळलेली आणि सर्वांना समजलेली आहे. चिरीमिरीचा किमान एक टक्का ते वर कितीही टक्के हा शिरस्ता सर्वांना चांगलाच सरावाचा झालेला आहे. आता अशी कामे होणार असतील तर उन्हाळा भलेही सोसतील; पण पावसाळ्यात तर रंग दाखवणारच. Nagpur-Cement Road-Corruption मुंबईसह महाराष्ट्रातील बहुतांशी मोठ्या शहरांमध्ये हीच परिस्थिती आहे. अनेक शहरांमध्ये पावसाळ्यात पावसाच्या पाण्याचा दबाव हाताळून त्याचा व्यवस्थित निचरा करणाऱ्या प्रणालीचा अभाव आहे.
 
 
 
शहरीकरणामुळे नैसर्गिक मलनिस्सारण व्यवस्थेवर अतिक्रमण होते आणि पाणी साचण्याचे प्रमाण वाढते. विद्यमान ड्रेनेज सिस्टिमकडे कुणाचेच लक्ष नाही. काँक्रिटच्या थराखाली काय होतेय्, याचा काहीही अंदाज नाही. तेथे गाळाचे ढिगारे होतात आणि पाण्याचा प्रवाह रोखतात. Nagpur-Cement Road-Corruption मग नद्या-नाले फुगतात आणि पूर येतो. महाराष्ट्रातले तर सोडा; देशातले एकही शहर असे नाही की जिथे सांडपाणी किंवा अतिरिक्त पावसाच्या हाताळण्यासाठीची व्यवस्था आहे किंवा केली जात आहे. ‘स्मार्ट सिटी'च्या नावाने सर्वांचे चांगभले तेवढे सुरू आहे. महापालिकांवर सनदी अधिकाऱ्यांचा ताबा असतो. तेच त्यांचे प्रमुख कारभारी असतात. अनुभवी लोक असतात. त्यांच्यापैकी अनेकांनी लोकप्रशासन, नागरी नियोजन यात उच्च शिक्षण घेतलेले असते. अनेकांनी तर विदेशात जाऊन पदव्या मिळविलेल्या असतात. मात्र, त्यांच्या पदव्यांचा शहरी नियोजनात काहीही उपयोग होत नाही. त्यांना हे कळत नाही असे नव्हे; पण टक्केवारी सिस्टिममुळे व्यवस्थेत काम करण्यासाठी आलेली जवळजवळ प्रत्येक व्यक्ती प्रवाहपतीत होते आणि जी होत नाही, तिची बदली होते.Nagpur-Cement Road-Corruption हवामान बदलामुळे आता कधीही पाऊस येतो. शहरांमध्ये पूर येतो. लोकांची घरे पडतात. झोपड्या वाहून जातात. पण, जबाबदारी कुणाचीच नसते.
 
 
कधी तरी जबाबदारी निश्चित करण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला पाहिजे. कधी तरी महापालिकेच्या आयुक्तांना जबाबदार धरले पाहिजे. सिटी इंजिनीअरला जाब विचारला पाहिजे. ते कधीही होत नाही. किमान चौकशी करायची तर तीही होत नाही. त्यामुळे पुन्हा अशा घटना घडल्या तर काय करावे, याचा कोणताच अंदाज नसतो. यातील सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे अशा विषयांचे निर्णय घेण्याची प्रक्रिया तांत्रिक व प्रशासकीय कौशल्याऐवजी राजकीय भूमिकेतून प्रभावित केली जाते आणि त्यात टक्केवारीचा बोलबाला असतो. Nagpur-Cement Road-Corruption या टक्केवारीच्या नादात आपली शहरे आपणच नासवीत आहोत, उद्या ती आपल्या मुलाबाळांनादेखील राहण्याच्या लायकीची राहणार नाहीत, असा विचार कुणाच्या मनात येत नसेल काय, असा प्रश्न आपल्याला पडतो. पावसाचा संबंध पूर्वापार निसर्गाच्या कृपादृष्टीशी आहे. पाऊस हा अनेकदा आनंदाचा विषय असतो. पण, शहरांमध्ये आजकाल एक तर प्रचंड उष्मा, दमट हवामान असते किंवा = इतका पाऊस असतो की जीव नकोसा व्हावा. यावर मार्ग काढता येणे शक्य आहे. पण, तो काढण्यासाठी वरपासून खालपर्यंत सर्वांना टक्केवारीच्या लोभातून बाहेर यावे लागेल. टक्केवारीच्या लोभाने एक दिवस शहरांचे स्वरूप अत्यंत भयानक झालेले असेल आणि सामान्य माणसं त्याची बळी ठरतील.
Powered By Sangraha 9.0