सरगम सांगीतिक महोत्सव २०२४

10 Jul 2024 17:13:42
नागपूर, 
Sargam Sangeet शनिवार दिनांक २९जून ते १७ ऑगस्ट पर्यंत सरगम संगीत अकादमी, दुर्गा नगर (अयोध्या नगर).द्वारा प्रस्तुत. सरगम सांगीतिक महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. एकूण८ समुहामधे प्रत्येकी १० कलावंतांचा संच दर शनिवारी आयोजित करण्यात येत आहे. सरगम संगीत अकादमीचे एकूण ८० विद्यार्थी हिंदी - मराठी गीत, भावगीत, फिल्मी गीत, भक्तीगीत प्रकारातील आपली एकल आणि युगल गाणी प्रत्यक्ष वादकांसोबत सादर करणार आहेत.
zx 
 २९ जूनला सायंकाळी ७ वाजता संत गजानन महाराज मंदिर, योगा शेड जुना सुभेदार इथे ग्रुप १चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.कार्यक्रमाची निर्मिती संकल्पना आणि संगीत नियोजन भरत नरुले यांचं. वाद्यवृंद अनुप तायडे, सौरभ किल्लेदार, रोशन उके. निवेदक डॉ संजय भक्ते होते.Sargam Sangeet सहभागी गायक कलावंत  तेजस्विनी कोमलकर,माधवी जूननकर, असित गडपायले, सुरभी भट्टाचार्य, कल्पना भोंगाडे, धीरज पारपल्लिवार, रंजना घाडगे, संध्या कुकडे, कविता कोटकर, शुभांगी सांभारे,याप्रसंगी सहभागी कलावंतांचे कुटुंब, संगीत प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कलावंतांचे कौतुक केले.
सौजन्य: चंद्रशेखर इंगळे,संपर्क मित्र  
Powered By Sangraha 9.0