4,600 हून अधिक भाविक अमरनाथ यात्रेसाठी रवाना!

10 Jul 2024 12:34:06
जम्मू,
Amarnath Yatra मुसळधार पावसात, अमरनाथ यात्रेत सामील होण्यासाठी बुधवारी पहाटे 4,600 हून अधिक यात्रेकरूंची ताजी तुकडी काश्मीरमधील दोन बेस कॅम्पसाठी जम्मूहून निघाली. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. येथील भगवती नगर बेस कॅम्पमधून काश्मीरमधील बालटाल आणि पहलगाम बेस कॅम्पसाठी रवाना झालेल्या यात्रेकरूंची ही 13 वी तुकडी आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, 4,627 यात्रेकरूंचा समूह पहाटे 3 वाजता 185 वाहनांमधून बम बम भोलेच्या घोषणा देत निघाला आणि त्यांना सीआरपीएफच्या तुकडीने सुरक्षा पुरवली. अधिकाऱ्यांच्या मते, 95 वाहनांमधील 2,773 यात्रेकरूंनी यात्रेसाठी 48 किमी लांबीचा पारंपारिक पहलगाम मार्ग निवडला आहे, तर 90 वाहनांमधील 1,854 यात्रेकरू तुलनेने लहान (14 किमी) परंतु कठीण बालटाल मार्गाने गुहेच्या मंदिरापर्यंत जातील. हेही वाचा : अमेरिकेतील कार्बाईन दहशदवाद्यांची का आहे पहिली पसंती ...कुठे कुठे वापरली आहे ?
 
 
amarnaa
हेही वाचा : व्हॉट्सॲपने ग्रुप सदस्यांसाठी आणले एक नवीन धासू फीचर जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी 28 जून रोजी अमरनाथ यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा दाखवला होता. तेव्हापासून जम्मू बेस कॅम्पवरून एकूण 72,325 यात्रेकरू घाटीकडे रवाना झाले आहेत. 52 दिवसांच्या यात्रेची औपचारिकपणे 29 जून रोजी काश्मीरमधील Amarnath Yatra दोन बेस कॅम्पपासून सुरुवात झाली आणि 19 ऑगस्टला तिचा समारोप होईल. गेल्या वर्षी साडेचार लाखांहून अधिक भाविकांनी बाबा बर्फानीचे दर्शन घेतले होते.  हेही वाचा : वारंवार रस्ते अपघात होण्याचे कारण काय? जाणून घ्या
Powered By Sangraha 9.0