नागपूर,
Baji Prabhu Deshpande सीताबर्डी मित्र मंडळच्या वतीने बाजीप्रभू देशपांडे यांना बलिदान दिनी विनम्र अभिवादन करण्यात आले."जोपर्यंत तोफेचा आवाज माझ्या कानाला ऐकू येत नाही, तोपर्यंत यमाला सांगा, मला मरायला वेळ नाही!" दोन्ही हातात तलवार घेऊन महारुद्रावतार धारण करीत प्राणांची बाजी लावत महाराज गडावर सुखरूप पोहोल्याचा संकेतरूपी तोफांचा आवाज ऐकेपर्यंत निवडक मावळ्यांसह सिद्धी जोहरच्या बलाढ्य सेनेला मात देत शर्थीने खिंड लढवणाऱ्या वीर योद्धा, नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांचा बलिदान साजरा करण्यात आला. रामनगर चौकातील बाजीप्रभूंच्या पुतळ्याला.भाग संघचालक श्याम पत्तरकिने यांचे हस्ते माल्यापर्ण करण्यात आले. प्रसंगी प्रमुख पाहुणे कार्यकारी अभियंता (म्हाडा),दिप्ती काळे, सीताबर्डी मित्र मंडळाचे संयोजक दिनेश गावंडे, विनोद माहुले, अमोल तपासे, धनंजय डेग्वेकर, आदित्य गांधी, उमेश अनखिंडी, कृष्णा बारई, समीर अवधाने, अजय मुंजे, प्रसाद आष्टीकर उपस्थित होते.
सौजन्य:अमोल तपासे, संपर्क मित्र