वारकरी आणि रामदासी

14 Jul 2024 04:40:13
प्रासंगिक
 
- दिवाकर बुरसे
Pandharpur-Warkari देशात विशेषतः महाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय भक्तिपंथ म्हणजे ‘भागवत संप्रदाय' किंवा  ‘वारकरी संप्रदाय' हा वारकरी संप्रदाय कर्नाटक, तेलंगणा, आंध्र, तामिळनाडूपर्यंत पसरला आहे. हजारो-लाखो विठ्ठलभक्त प्रतिवर्षी पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी येत असतात. Pandharpur-Warkari आषाढी-कार्तिकीच्या वारीत सहभागी होत असतात. वारकऱ्यांचं आराध्य दैवत म्हणजे कटेवरी उभयकर ठेवून विटेवरी युगे अठ्ठावीस भक्तांंची वाट पाहात तिष्ठत उभा ठाकलेला पंढरीचा सावळा पांडुरंग, विठुराया, विठ्ठल. हा विठ्ठल म्हणजेच वसुदेव-देवकी यांचा पुत्र, यशोदेचा लाडका लल्ला, कंसचाणूरादी दुष्टांचे मर्दन करणारा, गोपगोपींचा कान्हा, कन्हैया, बंशीधर, अर्जुनाचा सखा, महान तत्त्वज्ञ, योगयोगेश्वर, महाविष्णूचा आठवा अवतार भगवान श्रीकृष्ण...! त्याच्यावर या वारकऱ्यांची अपरंपार दृढ श्रद्धा! Pandharpur-Warkari
 
 
 
Pandharpur-Warkari
 
 
विठ्ठल वारकऱ्यांचे सर्वस्व आहे. वारकरी विठ्ठलावर अपार प्रेम करतात. तो विठुराया कुटुंबवत्सल आहे, ‘लेकुरवाळा' आहे. तो त्यांचा मायबाप, बंधू, मित्र, सखा, सवंगडी, सोबती आणि सर्वकाही आहे. Pandharpur-Warkari ते त्याला भेटतात, त्याच्याशी बोलतात, आपली सुखदुःखे सांगतात, त्याच्यावर प्रेम करतात, त्याच्याशी खेळतात, भांडतात, रागावतात, रुसतात. कधी कधी अबोलाही धरतात. सर्वसामान्यांच्या मनाला भिडणारा, अत्यंत सोप्या, सरळ भाषेत सांगितल्या गेलेल्या उपदेशामुळे हा पंथ लोकांना आपलासा वाटू लागला. वारकऱ्यांचे शुद्ध आचरण, शुद्ध चारित्र्य, सर्वांविषयी समभाव, विनम्र वाणी, अशा सात्त्विक जीवन आणि व्यवहारमूल्यांमुळे हा पंथ जनमानसात रुजला, फोफावला, लोकप्रिय झाला. Pandharpur-Warkari विठ्ठलाचा आद्य भक्त पुंडलिक. वारीची परंपरा पुंडलिकापासून सुरू झाली, पण या संप्रदायाला १३ व्या शतकात ज्ञानेश्वरांनी विशेष गती दिली, सक्रिय केले. पंथाचा पाया सशक्त, सुदृढ केला. अठरापगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन, उच्च विचारांची बैठक देऊन, उच्च-नीचतेला, भेदाभेदाला जराही थारा न देता पंथात सर्वांना समान स्थान देऊन भागवत धर्माच्या ध्वजाखाली गोळा केले, पंथात सामावून घेतले.
 
 
 
त्यामुळे वारकरी पंथाला नवचैतन्य लाभले. Pandharpur-Warkari नामदेव, तुकाराम, चोखामेळा, सावतामाळी, जनाबाई इ. व अशा संतांची मालिकाच या पंथात सुरू झाली. या पंथात ‘ग्यानबा तुकाराम'च्या घोषात, संतनामांच्या भजनात वारकरी, निवृत्ती-ज्ञानदेवांपासून तुकाराम महाराजापर्यंत सर्व संतांना कृतज्ञतेने वंदन करतात. हा संप्रदाय सर्वसमावेशक आहे. ‘अमंगळ भेदाभेदाला' त्यात जराही स्थान नाही. म्हणूनच वारकरी संप्रदायात खंडोबाचे उपासक, भवानी-लक्ष्मीचे भक्त, जैन, शैव, लिंगायत हेही सहभागी होऊन विठ्ठलाचे उपासक, भक्त झाले आहेत. Pandharpur-Warkari दत्त संप्रदायी असूनही पैठणच्या नाथ महाराजांनी वारकरी संप्रदायासाठी फार अलौकिक कार्य करून ठेवले आहे. आषाढी व कार्तिकी एकादशीला सर्व वारकरी आपल्या प्रिय विठुरायाला भेटण्यासाठी नाचत-गात लक्षावधींच्या संख्येने पायी पंढरपूरला जातात. वारीत स्नेहपूर्ण वातावरण असते. तेथे कसलाही भेदभाव नसतो. Pandharpur-Warkari एकमेकांचा आदर करीत परस्परांना ‘माउली, माउली' म्हणत वारकरी एकमेकांच्या पाया पडतात. रामकृष्णहरीच्या घोषात आनंदे नाचत-बागडत शतयोजने पायी चालण्याचे श्रम त्यांना जराही जाणवत नाहीत.
 
 
समर्थ रामदासांच्या काळीही पंढरीच्या वारीची लोकप्रियता जराही कमी झालेली नव्हती. स्वतः समर्थ रामदास स्वामी मुळात भक्तिपंथाचेच ‘वारकरी!' त्यांना वारीचे महत्त्व ठाऊक होते. वारीनिमित्त लोकांना एकत्र आणून त्यांच्यात विचारांचे आदानप्रदान घडवून आणण्यासाठी वारी हे उत्तम निमित्त आहे, हे रहस्य समर्थ ओळखून होते. Pandharpur-Warkari समर्थ भक्तियोगाचे खंदे पुरस्कर्ते होते. त्यांनी ग्रंथराज दासबोधाच्या आरंभीच भक्तीचे महत्त्व निःसंदिग्ध शब्दांत सांगितले आहे की, ‘भक्तीचेनि योगें देव । निश्चयें पावती मानव' दासबोधाचा हाच एकमेव अभिप्राय आहे. मग प्रश्न पडतो की, विठ्ठलभक्तीचा एवढा बहुजनमान्य वारकरी संप्रदाय कार्यरत असतानाही आणि स्वतः समर्थ भक्तिमार्गी असूनही त्यांना वेगळा ‘रामदासी भक्तिपंथ' का काढावा लागला? या प्रश्नाचे उत्तर त्यावेळच्या अन्यायाने पिचलेल्या, गांजलेल्या, कणा मोडून पडलेल्या समाजाच्या दुरवस्थेत आहे. Pandharpur-Warkari समर्थांनी १२ वर्षे देशभर तीर्थाटनाचे ‘आसेतुहिमालय' भ्रमण केले. या भ्रमंतीच्या काळात त्यांनी हिंदू समाजाला, संस्कृतीला आलेली अवकळा, दैन्य अगदी जवळून पाहिले. त्यांना हिंदू धर्मात मतमतांचा गलबला जाणवला.
 
 
 
लोक दिशाहीन झाले होते. कहर म्हणजे काही जण तर अगदी पीर, फकीर, दावलमकांस भजू लागले होते, मुसलमान गुरू करू लागले होते. राज्य म्लेंच्छांचे, मूर्तिभंजकांचे, लुटारूंचे होते. नीतिन्यायाची चाड नसलेले मुसलमानी राज्यकर्ते देशावर राज्य करीत होते. त्यांची दुष्कृत्ये, बाटवाबाटवी, स्त्रियांना पळवणे, त्यांना भ्रष्ट करणे, मंदिरे, प्रार्थनास्थळे उद्ध्वस्त करणे, उपास्य देवदेवतांच्या मूर्ती फोडणे, हे उघडपणे निर्ढावलेपणे सुरू होते. Pandharpur-Warkari हा सारा विध्वंस पाहून, जनतेवर अनन्वित अत्याचार व त्यातून लोकांचे होणारे हाल पाहून स्वामींचे हृदय पिळवटून गेले. मुसलमानी राजवटीतील अराजकता, विध्वंस, सांस्कृतिक व राजकीय आक्रमणे या झंझावाताचा जोर इतका होता की, आपला अत्यंत सहिष्णू हिंदू धर्म, आपली उन्नत संस्कृती टिकते की नाही, याची शंका यावी. या वावटळीतून आपला हिंदू धर्म, हिंदू समाज वाचला तर आपल्या पूजाअर्चेला, ध्यानधारणेला भगवद्भक्तीला काही अर्थ; अन्यथा सारेच व्यर्थ आहे, या विचारांनी स्वामी अत्यंत अस्वस्थ झाले. अहर्निश केलेल्या qचतनातून त्यांच्या मनात काही योजना आकार घेऊ लागली. मनात विलक्षण क्रांतीची ज्योत भडकू लागली. Pandharpur-Warkari
 
 
देश टिकला तरच धर्म टिकेल, हे त्यांना प्रकर्षाने जाणवले. Pandharpur-Warkari प्रथम राष्ट्र, नंतर धर्म हे सत्य त्यांना कळून चुकले...! अशा सामाजिक, राजकीय अनागोंदीच्या परिस्थितीत ‘कटेवरी हात' ठेवून उभ्या राहिलेल्या विठ्ठलाऐवजी समर्थांना कोदंडधारी श्रीरामाच्या कृपेची, अनुग्रहाची अधिक आवश्यकता वाटली. तत्कालीन भक्तिपरंपरेतील कालसापेक्ष उणिवाही त्यांना प्रकर्षाने जाणवल्या. भगवद्गीतेत भगवंतांनी अवताराचे प्रयोजन सांगताना, ‘परित्राणाय साधूनां । विनाशाय च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय । सम्भवामि युगे युगे ।' असे सांगितले आहे. वारकरी संप्रदायातील विठ्ठलभक्तीने ‘साधूसज्जनांचे रक्षण' केले होते. भक्तीचे प्रयोजन सांभाळले होते. विठुरायाने आपल्या भक्तांना महासंकटातून स्वतः मनुष्यरूपात प्रकट होऊन सोडविल्याच्या अनेक कथा आहेत. Pandharpur-Warkari सेनान्हावी, दामाजीपंत, दासोपंत, कान्होपात्रा इ. भक्तांना विठ्ठलाने संकटांतून वाचवले होते. असे असले तरी ही संकटे निर्माण करणाèया दुष्टांचा विनाश होताना दिसत नव्हता. ही उणीव भरून काढून दुष्टांंच्या नाशाची योजना करावी व त्यासाठी परमेश्वराचे साहाय्य मागावे, असे रामदासांना वाटत होते. त्यासाठी श्रीराम हे दैवत त्यांना अधिक भावले.
 
 
 
या विचारातून समर्थांनी कोदंडधारी शस्त्रसिद्ध श्रीराम आणि त्यांचा गदाधारी, वज्रदेही, बुद्धिमतांवरिष्ठम्, स्वामिनिष्ठ हनुमान यांची उपासना करायला सांगून समाजाला धीर दिला. Pandharpur-Warkari क्षात्रतेज हरवून बसलेल्या जनतेला विध्वंसक यावनी राजवटीच्या नाशाची प्रेरणा दिली. तरुणांना बलोपासना व शस्त्रसाधना करण्यासाठी उद्युक्त केले. देशभर बलोपासकांचे मठ, संघ स्थापन केले. राष्ट्र व धर्म रक्षणाची एक चळवळच हाती घेतली. त्यासाठी सहायक ठरेल असा विशेष ‘रामदासी पंथ' किंवा ‘समर्थ संप्रदाय' स्थापन केला. असे असले तरीही ‘समर्थ संप्रदाय' हा भक्तिपंथच होता, हे दुर्लक्षिता कामा नये. रामदासांनी सांगितलेल्या संप्रदायाच्या प्रेरणा काळानुसार दुष्ट-दुर्जनांच्या नाशाच्या आणि आपल्या संस्कृतिरक्षणाच्या होत्या. Pandharpur-Warkari रामदास विलक्षण बुद्धिमान, धूर्त, चाणाक्ष, विचक्षण व विवेकी होते. ते उत्तम गुरू व संघटक होते. आपल्या नियोजित कार्यासाठी व संघटनेसाठी राजराजेश्वर श्रीराम व त्यांचा अनन्य भक्त, रुद्रावतारी हनुमानाच्या भक्तीची निवड समर्थांनी विचारपूर्वक केली. स्वामींनी राम आणि विठ्ठल यांना कधीच वेगळे मानले नाही. राम व विठ्ठल एकच आहेत अशी त्यांची स्पष्ट, दृढ श्रद्धा व शिकवण होती.
 
 
 
स्वामी पंढरपूरला विठ्ठल दर्शनाला गेले होते तेव्हा साक्षात पांडुरंगानेच त्यांना रामरूपात दर्शन दिले होते. हा साक्षात्कार पाहून स्वामींच्या तोंडून सहज, उत्स्फूर्त उद्गार निघाले, ‘येथे का उभा श्रीरामा । मनमोहन मेघश्यामा ।' या कवितेत समर्थ पुढे विठ्ठलाला पृच्छा करतात, ‘कुठे गेली सीतामाई, इथे राही रखुमाबाई ।। काय केले वानरदळ इथे मेळविले गोपाळ ।। चापबाण काय केले । कर कटेवरी ठेविले ।।' समर्थांची भक्ती, उपासना तीच होती, जशी वारकऱ्यांची असते. Pandharpur-Warkari केवळ काळानुसार तत्त्वज्ञानात किंचित भेद होता. येथे समर्थांना वारकèयांच्या भक्तिभावाला जराही उणे ठरवायचे नव्हते. त्यांना भगवंताच्या अवताराचे प्रयोजन काळानुरूप वेगळे असते, एवढेच सांगायचे होते. ‘मऊ मेणाहूनि' असलेल्या विष्णुदासांनी काळानुरूप ‘कठीण वज्रासी भेदू' अशी वृत्ती धारण करण्याची ही वेळ आहे, असे समर्थांना वाटत होते. Pandharpur-Warkari काळानुरूप केलेली उपासना अधिक फलदायी ठरते. अखेर वरील कवितेत समर्थ म्हणतात, ‘रामी रामदासी भाव । तैसा भेटे पंढरीराव ।।' रामदासांनी कोदंडधारी रामाची उपासना सांगितली म्हणून त्यांना भक्तिसंप्रदायापासून वेगळे काढता येत नाही. वारकरी संप्रदायाने त्यांना कदापि वेगळे समजूही नये.
 
 
 
अनंतबुवा मेथवडेकर हे मेथवडेकर-रामदासी घराण्याचे मूळ पुरुष होत. अनंतबुवा यांना रामदास स्वामी यांनी दृष्टांत देऊन पंढरपूर क्षेत्री श्रीपांडुरंगामध्ये श्रीरामाचे दर्शन घडवले आणि ‘पंढरीची वारी तुमच्या पिढीत अखंड चालवावी' असा आदेश दिला. समस्त मेथवडेकर मंडळी ही वारी आजतागायत विनाखंड चालवत आहेत. अनंतबुवा रामदासी यांची समाधी मेथवडे गावी असून ते सोलापूर जिल्ह्यामधील सांगोला तालुक्यात आहे. तिथे मेथवडेकर-रामदासी परिवाराचे पुरातन राम मंदिर आहे. श्री पंढरपूर क्षेत्री मेथवडेकर-वारी मंडळाचा कासार घाटावर मठ आहे. समर्थभक्त श्रीकृष्णबुवा रामदासी (मेथवडेकर) यांनी त्या नेमून दिलेल्या पंढरीच्या वारीचे वर्णन आणि महत्त्व सांगणारी एक सवायी लिहिली, ती पण उपलब्ध आहे. शके १५७१ मध्ये पंढरपूरहून परत जाताना श्री समर्थांचा मुक्काम मेथवडे येथे माण नदीमध्ये असलेल्या मांडवखडक या खडकावर होता. भिक्षा मागून परतणाऱ्या  शिष्यासोबत अनंतबुवा कुलकर्णी मेथवडेकर श्री समर्थ दर्शनासाठी गेले. तेथे त्यांना स्वामींचा अनुग्रह प्राप्त झाला.
 
 
 
श्री समर्थांना त्याच नदीत विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्ती मिळाल्या. मेथवडे मठ स्थापना करून त्या मूर्तींची स्थापना समर्थांच्या हस्ते झाली. समर्थ व वारकरी संप्रदाय समन्वयाची मुहूर्तमेढ समर्थांच्या हस्ते झाली. परंपरेने समर्थांचे प्रतिनिधी म्हणून मेथवडे मठातून आषाढी वारी पंढरपूरसाठी सुरू झाली. पुढे गोजीवनदास चौंडे महाराज व त्यांचे पुत्र नानामहाराज चौंडे यांनी या वारीला दिंडीचे स्वरूप दिले. पंढरपूर आषाढी वारी पालखी सोहळा ट्रस्ट कासारघाटावर स्थापन करून समर्थांनी दिलेल्या पादुका तेथे स्थापन झाल्या. (संदर्भ : आंतरजाल) वरील विवेचनावरून निश्चितपणे असे म्हणता येईल की, वारकरी आणि रामदासी हे महाराष्ट्रातील दोन्ही लोकप्रिय संप्रदाय भक्तिसंप्रदायच आहेत. दोन्ही भागवत पंथाचेच प्रवाह आहेत. विठ्ठल आणि श्रीराम वेगळे नसून एकच आहेत. एकाच विष्णूची ही दोन रूपे आहेत. ‘हाचि तुक्याचा विठ्ठल आणि दासांचा श्रीराम !' तेव्हा वारकऱ्यांनी रामदासांना आणि त्यांच्या रामदासींना वेगळे समजू नये. रामदासी पंथीयांनीसुद्धा वारकऱ्यांपासून अंतर ठेवून वावरू नये.
 
 
 
उपास्य देवदेवतांचे, जातिपंथांचे, संप्रदायांचे, उपासना पद्धतीचे भ्रामक अभिनिवेष समाजाला दुबळे करतात, समाजाची एकता भंगवतात. हिंदू धर्मीयांनी वेळीच जागे व्हावे. नजिकच्या भविष्यात हिंदूंना फार मोठ्या संघर्षाला सामोरे जावे लागेल, अशी चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांनी याविषयी पूर्वीच भाकीत करून ठेवले आहे की, ‘या देशातील हिंदूंना, आपल्याच देशात, आपल्या स्वत:च्या आणि आपल्या धर्माच्या अस्तित्वासाठी घनघोर संघर्ष करावा लागेल.' प्रत्येक भारतीय हिंदूने वीरजींची ही भविष्यवाणी सतत स्मरणात ठेवून, समाज म्हणून एकसंध राहावे. वारकरी आणि रामदासी, शैव आणि शाक्त, लिंगायत, महानुभाव एवढेच नव्हे तर जैन, शीख हे सारे  हिंदू म्हणून एकच आहेत, एकसंध आहेत. सारे हिंदू राष्ट्रभक्त आणि सनातन हिंदू धर्माभिमानी आहोत, हे आपण आपल्या कृतीतून जगाला दाखवून द्यावे.
 
 
 
या राष्ट्र व धर्मकार्याला श्रीराम व श्रीविठ्ठलाचे आशीर्वाद आहेतच.
- चाहे राम कहो या श्याम, जगमे सुंदर है दो नाम ।। (भजन)
- जय जय राम कृष्ण हरी (वारकऱ्यांचा प्रभावी मंत्र)
- मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा ।। (समर्थ शिकवण)
- हिंदू तितुका मेळवावा, हिंदू धर्म वाढवावा।। (हिंदू धर्मीयाचे स्वप्न)
- जय जय रघुवीर समर्थ ।। (रामदासस्वामींचे घोषवाक्य)
९२८४३००१२५
Powered By Sangraha 9.0