घोरपड शिकार प्रकरणी एक आरोपी अटकेत

Ghorpad-killed-wild lizard तीन आरोपी फरार

    दिनांक :15-Jul-2024
Total Views |
आकोट,
 
 
Ghorpad-killed-wild lizard तालुक्यात एका ठिकाणी घोरपडीची शिकार करण्यात आल्याची माहिती वनविभागाच्या अधिकार्‍यांना मिळाल्यावर त्यांनी तालुक्यातील मौजा वडाळी देशमुख येथील रहिवासी हरिश्चंद्र महादेव दहातोंडे वय 65 यांच्या घरी शनिवार 13 जुलै रोजी जावून त्यांच्या गोठ्यात झडती घेऊन पाहणी केली असता Ghorpad-killed-wild lizard  घटनास्थळी वन्यप्राणी घोरपड यांचे मृत (कापलेले) शरीराचे तुकडे तसेच वन्यप्राणी काळवीटचे दोन शिंगे दिसून आलेत.या प्रकरणी वनविभागाच्या अधिकार्‍यांनी एका आरोपीस ताब्यात घेतले आहे तर यातील तीन आरोपी फरार झाले आहेत.Ghorpad-killed-wild lizard
 
 
Ghorpad-killed-wild lizard
 
 
ज्या लाकडावर वन्यजीवाच्या शरीराचे तुकडे केले तो लाकडी बुंधा आरोपी हरिश्चंद्र दहातोंडे याने दाखवून दिला. या घटनेत वनअधिकार्‍यांनी सखोल चौकशी केली असता घटनेत सहभागी असलेले अन्य तीन आरोपी शेवकराम शालिकराम धांडे रा. वडाळी देशमुख, राजू गुलाब काकड रा. वडाळी देशमुख व पिंटू नागेश शिंगाडे रा. वडाळी देशमुख हे आरोपी फरार असून पुढील तपासासाठी त्यांचा शोध सुरू आहे. Ghorpad-killed-wild lizard  ही कारवाई अकोला प्रादेशिक वनविभागाचे उपवनसंरक्षक कुमारस्वामी एस.आर.,सहायक वनरक्षक (वने)सुरेश वडोदे यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा) अकोला वनपरिक्षेत्र विश्वास आर. थोरात यांनी वनकर्मचारी एस.पी.राऊत, वनपाल अकोट वर्तुळ, सुखदेव के. मुंडे ,वनरक्षक पि. ए. तुरुक ,वनरक्षक अतीक हुसेन, वनरक्षक सोपान रेळे, यशपाल इंगोले, दीपक मेसरे, सचिन बोके आदींनी केली आहे.Ghorpad-killed-wild lizard