धर्म-संस्कृती
- प्रा. दिलीप जोशी
Ashadhi Ekadashi 2024 आज आषाढी एकादशी. अख्खा महाराष्ट्र या दिवसाची आतुरतेने वाट पाहतो. या दिवशी लाखो वारकरी पंढरीत आणि कोट्यवधी भक्त आपापल्या घरी पांडुरंग परमात्म्याचे श्रद्धेने पूजन करतात. Ashadhi Ekadashi 2024 उपवास, भजन-पूजन, हरिपाठ आणि नाचू कीर्तनाचे रंगी असतात. ‘पंढरीचा वारकरी, वारी चुको ने दी हरी...' आयुष्यभर या वचनावर चालणारे वारकरी महाराष्ट्रात प्रचंड संख्येत आहेत. Ashadhi Ekadashi 2024 अशी काय जादू आहे की, वारकरी एक महिना पंढरीकडे अधीर होऊन आर्त भावाने पायी चालत पंढरी गाठतो. बरं! ही भेटीची आस फक्त वारकऱ्याकडून एकतर्फी आहे का? तर नाही! ते सावळं परब्रह्म आपल्या भक्ताच्या भेटीसाठी तितकेच आतुर असते.Ashadhi Ekadashi 2024
वाट पाहे उभा, भेटीची आवडी। कृपाळू तातडी उताविळ!
तो पंढरीचा निळा विठ्ठल आपल्या वारकरी भक्ताची आवडीने वाट पाहात पंढरपुरात उभा आहे आणि तोही उताविळ होऊन, तातडीने भेट व्हावी या इच्छेने कृपाळू होऊन उराऊर भेटीसाठी व्याकुळ झालेला असतो. Ashadhi Ekadashi 2024 देव आणि भक्त यांच्यातील भक्तिप्रेमाची ही उत्कट अवस्था!
दिवाळीच्या मुळा लेकी आसावली।
पाहतसे वाटुली पंढरीची।।
सासरी असणारी मुलगी जशी माहेरून मूळ घेऊन येणाऱ्या भावाची वाट पाहते तीच अवस्था वारकèयांची वारीसाठी असते. वारी आली की संसार देवाच्या स्वाधीन करून नामाचा गजर करीत पंढरीची वाट धरतो. यात देव आणि भक्तांचा गजर वारकऱ्यांची देहातीत अवस्था सांगते. ‘पुंडलिकवरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम' हा केवळ जयघोष नसून ऐश्वर्याचा विवेक उत्पन्न करणारा मंत्र आहे. त्यात हरी विठ्ठल परमात्मा आणि ज्ञानदेव तुकाराम हे भक्त यांचा जयघोष म्हणजे देव आणि भक्त हा दुजाभाव नाहीच. हा अद्वैत भाव म्हणजे विठ्ठलच विठ्ठलभेटीसाठी आतुर असणे होय. त्यामुळेच वारकरी जेव्हा पंढरीत दाखल होतो तेव्हा होणारी तगमग, भावावस्था ही वारीची फलश्रुती आहे.
‘जळ जैसे जळी वेगळे न दिसे.' पाण्यात पाणी टाकले तर पाण्याचे जसे अद्वैत होते तसेच वारकरी आणि विठ्ठल यांच्यात होते. वारकरी वारी पूर्ण करून राऊळात प्रवेश करतो तेव्हा होणारे पांडुरंगाचे भावदर्शन माउली, महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन गोड शब्दात केले. माउली जेव्हा गाभाऱ्यात आली आणि आर्तभावाने पंढरीश परमात्म्याला डोळा भरून पाहण्याचा प्रयत्न केला तेव्हा आतून शब्द आले...
पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती । रत्नकिळ फाकती प्रभा।।
अगणीत लावण्य, तेज पुंजाळले। न वर्णवे तेथिची शोभा।।
माउलींच्या विविध रचनेतील ही अनुरागाच्या सर्व अवस्था प्रकट करते.
जी अवस्था माउलींची झाली तीच भावावस्था वारकèयांची होते. वरील अभंग हा स्थुल किंवा भौतिक देहावस्थेच्या पलीकडला आहे. देहभानाचा विसर प्रत्येक वारकऱ्याला पडलेला असतो. मी आणि तू पणाची बोळवण झालेली असते. म्हणूनच अनेक दिवस विठुमाउलीच्या आलिंगन भेटीसाठी व्याकूळ होऊन पायी चालत चालत त्या पांडुरंगासमोर उभा राहतो तेव्हा तो योग सुखाचा सोहळा परमानंदाची अनुभूती होय. प्रत्यक्ष देव तर पाहिला नसेल कोणी पण भूवैकुंठ पंढरीत जी विटेवरची अगणीत लावण्य असलेली समचरण आणि समदृष्टी असलेली मूर्ती म्हणजे साक्षात परमात्माच आहे. कल्पना करा की, तिथे साक्षात परब्रह्म पांडुरंग परमात्मा प्रकट झाले आणि म्हणाले की, आजपासून ही मूर्ती नको त्या जागी विटेवर मीच सगुणसाकार रूपात इथे उभा राहतो तर वारकरी भक्त म्हणतील तुम्ही मूर्तीच्या बाजूला उभे राहा. आम्हाला कटेवर हात असलेला विटेवरचा पांडुरंगच हवा. वारकऱ्यांच्या दृष्टीने ती पाषाण मूर्ती नसून तो सुंदर ते ध्यान असलेला जीवीचा जीवलग आहे. तो पंढरीचा पाटील म्हणजे काही केलिया वेगळा नव्हे गे माये आहे. काहीही झालं तरी तो वेगळा नाहीच. म्हणूनच तर तेथे आलिंगन भेट दिली जाते.
‘ते निजबोधे उराऊरी, भेटतू आत्मया श्रीहरी' हे प्रमाण आहे. इतका जीवीचा जिव्हाळा त्या मूर्तिमंत विठ्ठलाविषयी आहे.
बरं! हे घट्ट नाते आजचे नसून अठ्ठावीस युगापासून म्हणजे चार युगाचे सात आवर्तन झालेत आजपर्यंत. इतके ते अतूट आणि अजोड असे निर्भेळ नाते आहे. पंढरपूरचे आणि पांडुरंगाचे वर्णन सर्वच संतांनी केले आहे. वैकुंठाच्याही आधी भूवैकुंठ पंढरीची रचना झाली. विठुराया तर आनंदाचा सागर असल्याचे वर्णन सर्व संत करतात. म्हणूनच वारीसाठी वारकèयांची ओढ अपरिमित आहे. केवळ विठ्ठल मूर्तीच नाही तर संत नामदेवराय पायरी, गरुड खांब किंवा दास खांब, कान्होपात्रेचं झाड या केवळ जड पाषाण किंवा वस्तू नाहीत तर या सर्व बाबी वारकरी भक्तांच्या सगेसोयऱ्यात किंवा रक्ताच्या नात्यात आहेत. त्यांच्या विषयीचा जिव्हाळा आणि आस्था जिवंत आहे. पंढरपुरातील प्रत्येक गोष्ट भक्तांसाठी हार्दिक आहे. ही बाब इतरांना समजू शकणार नाही. ‘पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी वेधले।' याची प्रत्यक्षानुभुती म्हणजे पांडुरंगाचा परिवार होय. वारकऱ्यांची पंढरीदेखील नात्यात आहे. इथला कण कण, चंद्रभागा, वाळवंट हे सर्व जिवंत नातेवाईकच आहेत. म्हणूनच वारकऱ्यांच्या दृष्टीतील पंढरपूर आणि इतरांच्या दृष्टीतील पंढरपूर यात प्रचंड अंतर आहे.
‘माझे जीवीचे आवडी, पंढरपुरा नेईन गुढीङ्क म्हणत जाणारा आर्त वारकरी हा त्या जड मूर्तीतील चैतन्याला जाणतो. त्या पांडुरंग कांतीचे दिव्य तेज स्वयंभू रूपात त्याला दिसते. एका अर्थाने वारीतील वारकरी बद्ध, मुमुक्षू, साधक अवस्थेच्या पलीकडला संत आहे. म्हणून परब्रह्म qलगाशी तादात्म्य पावतो.
संत नामदेवरायांच्या शब्दांत सांगायचे तर
‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल।
देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल।।१।।
माता विठ्ठल, पिता विठ्ठल ।
बंधु विठ्ठल, गोत्र विठ्ठल।।२।।
गुरू विठ्ठल, गुरुदेवता विठ्ठल ।
निधान विठ्ठल, निरंतर विठ्ठल।।३।।
नामा म्हणे मज विठ्ठल सापडला ।
म्हणुनि कळिकाळा पाड नाही।।४।।
९८२२२६२७३५