डोडानंतर आता कुपवाडामध्ये चकमक सुरू!

18 Jul 2024 13:43:28
कुपवाडा (रविंदर),
clash in Kupwara डोडानंतर आता कुपवाडामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुपवाडाच्या केरन सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ ही चकमक सुरू झाली. यादरम्यान या भागातील हवामानही खराब असल्याने तेथे धुके असते. या धुके आणि खराब हवामानात भारतीय लष्कराचे जवान आणि पोलिसांचे एस.ओ.जी. जवानांनी दहशतवाद्यांसोबत गोळीबार सुरूच ठेवला. मात्र, किती दहशतवादी लपले आहेत याची माहिती मिळालेली नाही. वृत्त लिहेपर्यंत दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू असून अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा दहशतवाद्याचा मृत्यू झाल्याचे वृत्त नाही.
हेही वाचा : अजबच...दुबईची राजकन्येने इन्स्टाग्रामवरुन दिला तलाक! 
dada
उल्लेखनीय आहे की याच सेक्टरमध्ये काही दिवसांपूर्वी घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला होता, ज्यामध्ये तीन दहशतवादी मारले गेले होते. आज सकाळीही डोडामध्ये दहशतवादी आणि भारतीय लष्करामध्ये चकमक सुरू आहे. यादरम्यान दोन जवानही जखमी झाले. clash in Kupwara डोडामधलं हवामानही खराब आहे आणि तिथेही अधूनमधून पाऊस पडत आहे. गेल्या एक महिन्यापासून डोडा, कठुआ, केरन, हिरानगरमध्ये पाकिस्तानी दहशतवादी सुरक्षा दलांवर सातत्याने हल्ले करत आहेत. या काळात सुरक्षा दलांचे नुकसान होत आहे. हेही वाचा : सावधान ! २०३० पर्यंत पसरणार 'हा' साथीचा रोग !
Powered By Sangraha 9.0