मिनी मंत्रालयातील कर्मचार्‍यांना दंड

    दिनांक :19-Jul-2024
Total Views |
- खर्रा-तंबाखू खाणे आले अंगलट

यवतमाळ, 
शासकीय कार्यालयात Kharra-tobacco खर्रा-तंबाखू खाऊ नये, असा नियम आहे. तरीदेखील यवतमाळ जिल्हा परिषदेतील 11 कर्मचारी कार्यालयीन वेळेत खर्रा खात असल्यामुळे त्यांच्यावर राष्ट्रीय तंबाखू नियंत्रक पथकाने शुक्रवार, 19 जुलै रोजी कारवाई केली असून या कर्मचार्‍यांना प्रत्येकी दोनशे रुपये दंड ठोकण्यात आला आहे. कार्यालयात तंबाखू, खर्रा, गुटखा खाणार्‍या दर्दी कर्मचार्‍यांवर आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांनी अचानक येऊन कारवाई केली. यात शिक्षणसह इतर सर्वच विभागांचा समावेश आहे.
 
 
Kharra-tobacco
 
Kharra-tobacco : कर्मचार्‍यांनी कार्यालयात अंमली पदार्थ सेवक करू नये असा नियम आहे. तरीदेखील जिल्हा परिषदेतील अनेक कर्मचारी या नियमांना सपशेल गुंडाळून ठेवतात. नुकतेच मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी त्यांच्या कक्षात दारू पिऊन येणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई केली होती. शुक‘वारी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रक पथकप्रमुख डॉ. मनाली बागडे यांच्या नेतृत्वात सागर परोपटेे, मोहित पोहेकर यांनी जिपच्या विविध विभागात भेट देऊन कर्मचार्‍यांची तपासणी केली. या दरम्यान 11 कर्मचारी खर्रा खात असल्याचे आढळून आल्याने या कर्मचार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.