दाऊदच्या टोळीतील सदस्यांना ‘यूएपीए’ लागू होत नाही

20 Jul 2024 19:36:56
- मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
 
मुंबई, 
गँगस्टर दाऊद इब्राहिम हा व्यक्तिगत दहशतवादी आहे. त्यामुळे त्याच्या टोळीतील सदस्यांवर बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा अर्थात् यूएपीए अंतर्गत कारवाई होऊ शकत नाही, असा निकाल Bombay High Court मुंबई उच्च न्यायालयाने दिला. मादकपदार्थ प्रकरणात पोलिसांनी दोघांवर यूएपीए अंतर्गत कारवाई केली आणि हे दोघे दाऊद टोळीशी संबंधित आहेत, असा दावा केला. या दोघांना जामीन मंजूर करताना न्यायालयाने हा निकाल दिला.
 
 

B High Court
 
न्या. भारती डंगरे आणि न्या. मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. न्यायमूर्ती म्हणाले, या कायद्यातील कलम 20 हे दहशतवादी टोळी किंवा संघटनेचा सदस्य असलेल्यांवर कारवाईसाठी आहे. दाऊद इब्राहिम कासकरला या शेड्युल 4 नुसार वैयक्तिक दहशतवादी घोषित केले आहे. त्यामुळे एखादी व्यक्ती दाऊद किंवा डी गँगशी संबंधित आहे, त्याला हे कलम 20 लागू होणार नाही.
 
 
Bombay High Court : केंद्र सरकार शेड्यूल एकनुसार काही संघटना, टोळ्यांना दहशतवादी जाहीर करते, तर शेड्युल 4 नुसार एखाद्या व्यक्तीला दहशतवादी जाहीर करते. 4 सप्टेंबर 2019च्या अधिसूचनेनुसार दाऊदला शेड्युल 4 नुसार दहशतवादी जाहीर करण्यात आले आहे. न्यायालयाने या प्रकरणी फैज भिवंडीवाला आणि परवेज वैद या दोघांना जामीन मंजूर केला. वैद आणि भिवंडीवाला या दोघांना 2022 मध्ये अटक केली होती. वैद हा दाऊद टोळीशी संबंधित आहे आणि त्याने दाऊद टोळीतील एकाला 25 हजार पाठवले होते, असे पोलिसांनी म्हटले आहे. दाऊदचा हस्तक अनिस इब्राहिम याचाही संदर्भ या खटल्यात देण्यात आला. भिंडीवाला याच्याकडे 600 ग्रॅम गांजा सापडला होता, पण तो दाऊदच्या टोळीशी संबंधित असल्याचे कोणतेही पुरावे पोलिसांनी सादर केले नाहीत, असे न्यायमूर्तींनी म्हटले आहे.
Powered By Sangraha 9.0