ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षणाचे आश्वासन जाहीरनाम्यात देणार का?

    दिनांक :20-Jul-2024
Total Views |
- चंद्रशेखर बावनकुळे यांचे महाविकास आघाडीला आव्हान

मुंबई, 
ओबीसींच्या आरक्षणामधून मराठा समाजाला आरक्षण देणार का? हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जाहीर करावे तसेच येत्या विधानसभा निवडणूक जाहीरनाम्यात महाविकास आघाडीने लेखी आश्वासन द्यावे, असे खुले आव्हान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष Chandrasekhar Bawankule चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
 
 
Chandrasekhar Bawankule
 
भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रपरिषदेत बावनकुळे बोलत होते. ते म्हणाले, ओबीसी समाजाचे आरक्षण कमी करून मराठा समाजाला आरक्षण देऊ, हे महाविकास आघाडीने जाहीर करावे. आपल्या जाहीरनाम्यात आघाडीने तसे आश्वासन द्यावे. आघाडीच्या 31 खासदारांनी ओबीसी समाजाचे आरक्षण कमी करून मराठा समाजाला देऊ हे जाहीर करावे, असे त्यांना माझे आव्हान आहे.
ठाकरेंनी मराठा आरक्षण गमावले
मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे, पण ते ओबीसींचे नुकसान करून नाही, अशी भाजपाची भूमिका आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला दिलेले आरक्षण उच्च न्यायालयात टिकले होते. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री असताना हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकवता आले नाही. असा हल्लाबोल Chandrasekhar Bawankule बावनकुळे यांनी केला.
पुण्यात रविवारी अधिवेशन
रविवारी पुण्यात होणार्‍या अधिवेशनाची माहिती बावनकुळे यांनी यावेळी दिली. ते म्हणाले, अधिवेशनाला उपस्थित 5,300 कार्यकर्ते, नेत्यांना केंद्रीय गृह मंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आदींचे मार्गदर्शन होणार आहे.

महाविकासला मत म्हणजे राज्याचे नुकसान
आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी दिलेले एक मत हे राज्यातील 14 कोटी जनतेचे नुकसान करणार आहे. मोदी सरकारच्या लोककल्याणकारी योजनांना राज्यात खीळ घालणे आणि त्या योजनांचा लाभ राज्यातील जनतेला घेऊ द्यायचा नाही, हा एकमेव अजेंडा मविआचा मागील काळात राहिला असल्याचा अनुभव महाराष्ट्राने घेतलाच आहे. मविआ सरकार सत्तेत आले तर महायुती सरकार आणि केंद्राच्या योजनांना राज्यात खोडा घालून लाडकी बहीण योजना, तीन सिलेंडर योजना, वीजबिल माफी, पीकविमा योजना, गरीब अन्न योजना, आवास यासार‘या योजना बंद करेल, असे Chandrasekhar Bawankule बावनकुळे म्हणाले.