अन्य प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही महाविद्यालयीन शुल्क माफ

20 Jul 2024 20:10:35
- राज्य सरकारचे परिपत्रक जारी

मुंबई, 
College fees waived : राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी मागास आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गातील केवळ विद्यार्थिनींसाठी परीक्षा शुल्क 100 टक्के माफ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, अतिमागास प्रवर्ग (इबीसी), आर्थिक दुर्बल घटक (इडब्ल्यूएस), सामाजिक आणि आर्थिक मागास (एसइबीसी) आणि ओबीसी प्रवर्गात पात्र ठरणार्‍या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींकडून महाविद्यालयात प्रवेशाच्या वेळी आकारण्यात येणारे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात आले आहे.
 
 
College fee
 
College fees waived : उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून यासंदर्भात शासन परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या निर्णयामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षात अतिमागास प्रवर्ग (इबीसी), आर्थिक दुर्बल घटक (इडब्ल्यूएस), सामाजिक आणि आर्थिक मागास (एसइबीसी) आणि ओबीसी प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. विविध मान्यताप्राप्त व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणार्‍या विद्यार्थी-विद्यार्थिनींना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पात्र विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या वेळी शुल्क मागणीसाठी आग्रह धरल्यास संबधित शिक्षण संस्थांच्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे कठोर निर्देश उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत.
Powered By Sangraha 9.0