कैद्यांना वेतन वाढ मिळावी

    दिनांक :20-Jul-2024
Total Views |
- तुरुंग प्रशासनाचा सरकारकडे प्रस्ताव

मुंबई, 
Increase in wages of prisoners : तुरुंग प्रशासन कैद्यांकडून विविध कामे करून घेतात. यातही कैद्यांच्या कुशलतेनुसार त्यांना कामे दिली जातात, या कामाचा मोबदला प्रत्येक कैद्याला दिला जातो. त्यातच आता कैद्यांच्या वेतनात वाढ करण्यात यावी, असा प्रस्ताव तुरुंग प्रशासनाकडून सरकारला पाठवण्यात आला आहे. विविध गुन्ह्यांमुळे लाखो कैदी तुरुंगात आपल्या शिक्षेचा कालावधी पूर्ण करीत आहेत, पण शिक्षा पूर्ण करीत असताना या काळात कैद्यांचा आर्थिक विकास व्हावा, या हेतूने तुरुंग प्रशासन कैद्यांकडून विविध कामे करून घेतात. दरम्यान, हा प्रस्ताव मंजूर झाला तर, याचा सात हजारहून अधिक कैद्यांना फायदा होणार आहे.
 
 
Kaidi
 
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात कैद्यांच्या वेतनात वाढ करण्यात आली होती. नव्या प्रस्तावानुसार, कुशल कैद्यांचे वेतन 74 रुपयांवरून 322 रुपये, अर्धकुशल कैद्यांचे वेतन 67 रुपयांवरून 302 आणि अकुशल कामगार कैद्यांचे वेतन 53 रुपयांवरून 288 रुपये करावे, असे प्रस्तावात नमूद आहे. म्हणजेच, कुशल आणि अर्धकुशल कैद्यांच्या वेतनात चार पटीने, तर अकुशल कामगार कैद्यांच्या वेतनात पाच पटीने वाढ करण्याची मागणी आहे.
 
 
Increase in wages of prisoners : कारागृहांमध्ये औद्योगिक आस्थापनांतर्गत सुतारकाम आणि लाकूडकाम, लोहार, हातमाग आणि यंत्रमाग, चामड्याचे काम, हस्तकला, मशीन असेंब्ली, बेकरी, पेपर क्राफ्ट, फाऊंड्री, कार वॉशिंग आणि लॉन्ड्री सेंटर, भोजनालय आणि कॅन्टीन आणि शिल्पकला अशा प्रकारची कामे केली जातात. शेत जागेत विविध भाज्या, फळे तसेच खाद्यान्नाचे उत्पादन केले जाते. याशिवाय, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, दुग्धव्यवसाय, मधमाशी पालन, मशरूम लागवड आणि चंदन, बांबू लागवड आणि सागवान यासारखे व्यवसायही केले जातात. अशी विविध कामं करणार्‍या कैद्यांना हा प्रस्ताव मंजूर झाल्यास फायदा होणार आहे.