मायक्रोसॉफ्टचे काही तासांत उडाले 23 अब्ज डॉलर्स

    दिनांक :20-Jul-2024
Total Views |
- बाजार भांडवल घटले
 
वॉशिंग्टन, 
Microsoft's market capitalization :  मायक्रोसॉफ्टच्या सेवा शुक्रवारी जगभरात ठप्प झाल्याचा फार मोठा फटका विमान, आरोग्य सेवा, शिपिंग, औद्योगिक आस्थापने, शेअर बाजार, बँका आणि वापरकर्त्यांना बसला. सुरक्षा सॉफ्टवेअर अपडेटमध्ये झालेल्या चुकीमुळे जगभरात हे आऊटेज झाले. दरम्यान, काही तासांतच मायक्रोसॉफ्टच्या बाजार भांडवलाचे अंदाजे 23 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले.
 
 
Microsoft'
 
मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प झाल्याचे पडसाद शुक्रवारी अमेरिकेतील शेअर बाजारात उमटले. डेटा इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म स्टॉकलिटिक्सच्या मते, मायक्रोसॉफ्टच्या शेअर्सची किंमत 443.52 डॉलर्सवरून 440.37 डॉलर्सपर्यंत खाली आली. क्राईडस्ट्राईकचे शेअर्स 11 टक्क्यांनी घसरले. शुक्रवारच्या जगभरातील आऊटेजमुळे क्राऊडस्ट्राईकचे शेअर्स 11 टक्क्यांनी घसरले. त्यांच्या प्रतिस्पर्धी कंपन्या सेंटीनेलवन आणि पावलो अल्टो नेटवर्क यांचे शेअर्स अनुक‘मे 8 आणि 2 टक्क्यांनी वाढले. मायक्रोसॉफ्टचे शेअर्स 0.7 टक्क्यांनी खाली आले. अमेरिकेच्या शेअर बाजारातील तिन्ही प्रमुख निर्देशांक नकारात्मक पातळीवर बंद झाले. डाऊ जोन्स इंडस्ट्रीयल अ‍ॅव्हरेज जवळपास एक टक्का घसरला. एस अ‍ॅण्ड पी 500 बाजार 0.7 टक्क्यांनी घसरला, तर टेक-हेवी नॅस्डॅक कंपोझिट 0.8 टक्क्यांनी घसरला.
 
 
Microsoft's market capitalization : क्राऊडस्ट्राईक हा प्लॅटफॉर्म सिक्योरिटी सुविधा पुरवतो. हा टेक उद्योगातील सर्वांत मोठ्या ऑपरेटरपैकी एक म्हणून ओळखला जातो. पण, त्यांच्या सॉफ्टवेअर अपडेटमध्ये झालेल्या चुकीमुळे जगभरातील मायक्रोसॉफ्टच्या सेवा ठप्प झाल्या. या सायबर सिक्युरिटी फर्मद्वारे सॉफ्टवेअर अपडेट करण्यात आले होते. त्यानंतर वापरकर्त्यांना मायक्रोसॉफ्ट 365 सह दुसर्‍या सेवांना आऊटेज समस्येचा सामना करावा लागला. या आऊटेजमुळे मायक्रोसॉफ्ट ऑपेरटिंग सिस्टिमवर चालणारे कॉम्प्युटर स्वतःच रिस्टार्ट होत होते. या तांत्रिक समस्येला ‘ब्ल्यू स्क्रीन ऑफ डेथ’ म्हटले जाते. क्राऊडस्ट्राईक अपडेटमुळे ‘ब्ल्यू स्क्रीन ऑफ डेथ’ची समस्या निर्माण झाली असल्याचे टेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे.