लाडकी बहीण योजनेचे अर्ज मविआ कार्यकर्त्यांकडे देऊ नका

    दिनांक :20-Jul-2024
Total Views |
- भाजपा नेते रावसाहेब दानवे यांचे आवाहन

मुंबई, 
लाडकी बहीण योजनेचा वापर करून महायुती सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी कार्यकर्त्यांकडून केला जात असल्याने महिलांनी या योजनेचे अर्ज विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांकडे न देता थेट सरकारी यंत्रणेकडे द्यावे, असे आवाहन भाजपाचे नेते Raosaheb Danve रावसाहेब दानवे यांनी केले. भाजपाच्या प्रमुख नेत्यांच्या 18 आणि 19 जुलै रोजी पार पडलेल्या दोन दिवसीय बैठकीत आगामी विधानसभा निवडणूक महायुती म्हणून एकत्रित लढण्याबाबत चर्चा झाली. विधानसभेच्या सर्व 288 जागांबाबत चर्चा झाली. कोणी किती जागा लढायच्या, याचा निर्णय महायुतीतील घटक पक्षांचे वरिष्ठ नेते योग्यवेळी घेतील, असे दानवे यांनी नमूद केले.
 
 
Raosaheb Danve
 
महायुतीत एकसंधपणा असताना महाविकास आघाडीत आलबेल नसल्याचे वारंवार दिसून येत आहे, अशी टीका दानवे यांनी केली. मविआतील तिन्ही प्रमुख घटकपक्षांचे नेते भावी मु‘यमंत्री म्हणून आपापल्या पक्षनेत्यांची नावे घेत आहेत. सर्वांनाच मु‘यमंत्री बनण्याची घाई झाल्याचे दिसून येते, अशी टीका त्यांनी केली. महायुती सरकार जनहितासाठी झटून काम करीत असून, विधिमंडळ अधिवेशनात शेतकर्‍यांची वीजबिल माफी, लाडकी बहीण, शेतकर्‍यांचे झालेल्या नुकसानाची भरपाई देणे हे आणि असे अनेक लोककल्याणकारी निर्णय घेण्यात आले, असे Raosaheb Danve दानवे यांनी नमूद केले.