मुंबईला अदानी सिटी होऊ देणार नाही : उद्धव ठाकरे

20 Jul 2024 20:47:59
मुंबई, 
मुंबईतील धारावी झोपडपट्टीच्या विकासाला पुन्हा Uddhav Thackeray उद्धव ठाकरे यांनी विरोधी केला असून, मुंबईला अदानी सिटी होऊ देणार नाही, अशी भूमिका ठाकरेंनी एका पत्रपरिषदेच्यातून जाहीर केली. उद्धव ठाकरेंनी शनिवारी पत्रपरिषद आयोजित केली होती. यात त्यांनी धारावीच्या पुनर्विकासाच्या मुद्यावरून सरकार आणि अदानींवर निशाणा साधला. ते म्हणाले की, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फसव्या घोषणांचा पाऊस पडत आहे. लाडकी बहीण-भाऊ वगैरे सुरू असतानाच लाडका मित्र किंवा लाडका कंत्राटदार किंवा लाडका उद्योगपती अशी योजना सुरू झाली आहे. गेल्या वर्षी आम्ही धारावीत मोर्चा काढला होता.
 
 

PTI07_20_2024_000061A
 
आमची मागणी आहे की, धारावीवासीयांना आहे तिथेच 500 चौरस फुटाचे हक्काचे घर मिळाले पाहिजे. धारावी ही केवळ झोपडपट्टी नाही, तर तिचे वेगळेपण आहे. तिथे एक इंडस्ट्रीयल इस्टेट आहे. तिथे प्रत्येक घरात मायक्रोस्केल उद्योग चालतात. त्यात कुंभार आहेत, चामड्याचा उद्योग आहे. इडलीचा उद्योग आहे. इतरही छोटे उद्योग आहेत. आता अदानीला धारावीचे टेंडर द्यायचा डाव आम्ही उधळून लावणार आहोत. उद्या कदाचित मुंबईचे नावही बदलून अदानी सिटी करतील, पण आम्ही धारावीवासीयांना उध्वस्त करण्याचा डाव यशस्वी होऊ देणार नाही. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे उदाहरण डोळ्यासमोर आहे. हे मुंबईला भिकेला लावण्याचे कारस्थान आहे, असा आरोप Uddhav Thackeray उद्धव ठाकरे यांनी केला.
Powered By Sangraha 9.0