अहमदनगरच्या नामांतराविरोधात उच्च न्यायालयात याचिका

    दिनांक :20-Jul-2024
Total Views |
- गुरुवारी सुनावणी
मुंबई, 
name change of Ahmednagar : महायुती सरकारने अहमदनगर शहराचे नामांतर अहल्यानगर करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौंडी येथील कार्यक्रमातून याबाबतची घोषणा केली होती. मात्र, अहमदनगरचे नामांतर करण्यास विरोध करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, राज्य सरकारने या नामांतरास मंजुरी दिली असली, तरी केंद्र सरकारची मान्यता घेणे गरजेचे आहे.
 
 
Bombay High Court
 
name change of Ahmednagar : राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात मुबंई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, अर्शद शेख आणि पुष्कर सोहोनी यांनी ही याचिका दाखल केली. यावर पहिली सुनावणी ही 25 जुलै रोजी होणार आहे. पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या अहमदनगर येथील चौंडी येथे अहल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहल्यानगर नावाची घोषणा केली होती. अहमदनगर महापालिकेच्या प्रशासकांनी देखील तसा ठराव पाठवला होता. राज्य सरकारने मंत्रिमंडळात अहल्यानगर नावाच्या प्रस्तावाला मान्यता दिली. सध्या हे प्रकरण केंद्र सरकारच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.