चांद्रयान-3 मोहिमेला जागतिक अंतराळवीर पुरस्कार

    दिनांक :21-Jul-2024
Total Views |
मिलान, 
Chandrayaan-3 mission : भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेने चंद्राच्या दक्षिण ध‘ुवावर यशस्वीपणे पाऊल टाकत नवीन इतिहास घडवला. भारताच्या या यशाची दखल जागतिक पातळीवर प्रथमच दखल घेण्यात आली असून, चांद्रयान-3 मोहिमेला जागतिक अंतराळ पुरस्कार जाहीर झाला आहे.
 

Chandrayaan-3 mission 
 
Chandrayaan-3 mission : इटलीतील मिलान येथे 14 ऑक्टोबर रोजी 75 वी आंतरराष्ट्रीय अंतराळवीर परिषद होणार आहे. या परिषदेत चांद्रयान-3 मोहिमेला हा पुरस्कार देण्यात येणार आहे. इंटरनॅशनल एस्ट्रोनॉटिकल फेडरेशनने सांगितले की, भारताशिवाय आतापर्यंत अमेरिका, रशिया आणि चीन चंद्रावर उतरले आहेत. इस्रोचे चांद्रयान-3 हे वैज्ञानिक प्रयोग आणि किफायतशीर अभियांत्रिकीचे अनोखे उदाहरण आहे. हे भारताच्या अवकाश संशोधनाच्या प्रचंड क्षमतेचे प्रतीक आहे. चांद्रयान-3 ने चंद्राची रचना आणि भूगर्भशास्त्रातील न पाहिलेले पैलू उघड केले आहेत. हे मिशन नवीन प्रयोगांसाठी जागतिक यश असल्याचे देखील महासंघाने स्पष्ट केले आहे.