एच-125 हेलिकॉप्टर निर्मितीसाठी एअरबसची आठ जागांना पसंती

    दिनांक :21-Jul-2024
Total Views |
मॅरिग्नेन, 
H-125 helicopter manufacturing project : भारतासाठी एच-125 हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्पासाठी युरोपातील दिग्गज कंपनी एअरबसने भारतातील आठ जागांना पसंती दिली आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन या वर्षाच्या अखेरीस होण्याची अपेक्षा आहे. हा प्रकल्प एक इंजीन असलेल्या एच-125 हेलिकॉप्टरसाठी चौथी फायनल असेंब्ली लाईन (एफएएल) असेल. येथे सुरुवातीला वर्षाला दहा हेलिकॉप्टर्सची निर्मिती केली जाईल. त्यानंतर मागणीनुसार या प्रकल्पाची उत्पादन क्षमता वाढवली जाईल, अशी माहिती एअरबसच्या अधिकार्‍याने दिली.
 
 
helicopter manufacturing
 
H-125 helicopter manufacturing project : हेलिकॉप्टरसाठी भारत ही भविष्यातील बाजारपेठ आहे. सध्या ही बाजारपेठ अतिशय लहान आहे. याच्या क्षमतेच्या तुलनेत ही बाजारपेठ प्रारंभिक अवस्थेत आहे, असे एअरबसच्या हेलिकॉप्टर विभागाचे जागतिक विपणन कार्यकारी उपाध्यक्ष ओलिव्हियर माइकलॉन यांनी सांगितले. एफएएलचा भूमिपूजन सोहळा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरपर्यंत अपेक्षित आहे. हा प्रकल्प 2026 मध्ये कार्यान्वित होईल तसेच 2026 च्या शेवटी हेलिकॉप्टर्स बाहेर पडतील. आम्ही आठ जागांची ओळख पटवली आहे आणि सध्या त्याचे मूल्यांकन अंतिम टप्प्यात आहे. आम्ही लवकरच याबाबत घोषणा करू, असे कंपनीने म्हटले आहे.