के. पी. शर्मा ओलींनी जिंकला विश्वासदर्शक ठराव

    दिनांक :21-Jul-2024
Total Views |
काठमांडू, 
नेपाळचे पंतप्रधान K. P. Sharma Oli  के. पी. शर्मा ओली यांनी रविवारी विश्वासदर्शक ठराव जिंकला. 275 सदस्यांच्या संसदेतील 188 सदस्यांनी ओलींना पाठिंबा दिला, तर 74 सदस्यांनी त्यांच्या विरोधात मतदान केले. विश्वासदर्शक ठराव जिंकण्यासाठी के. पी. शर्मा ओली यांना 138 खासदारांचे समर्थन आवश्यक होते. मी जाहीर करतो की पंतप्रधान ओली यांनी मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावाला बहुमताने मान्यता देण्यात आली, असे संसदेचे सभापती देवराज घिमिरे यांनी विश्वासदर्शक ठरावानंतर स्पष्ट केले. 15 जुलै रोजी 166 खासदारांच्या समर्थनाचे पत्र सादर करीत सीपीएन-यूएमएलचे अध्यक्ष ओली यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती.
 
 
K. P. Sharma Oli
 
याआधी ओली 11 ऑक्टोबर 2015 ते 3 ऑगस्ट 2016 या काळात नेपाळचे पंतप्रधान होते. या काळात भारतासोबत नेपाळचे संबंध तणावपूर्ण होते. यानंतर त्यांनी 5 फेब‘ुवारी 2018 ते 13 मे 2021 पर्यंत पंतप्रधान म्हणून काम पाहिले. आपल्या पहिल्या कार्यकाळात K. P. Sharma Oli ओली यांनी नेपाळच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप केल्याबद्दल भारतावर जाहीरपणे टीका केली आणि भारतावर त्यांचे सरकार पाडल्याचा आरोप केला होता. नेपाळमध्ये संविधान लागू झाल्यावर तेथे हिंसक निदर्शने झाली. या निषेधामागे भारताचा हात असल्याचा आरोप ओली यांनी केला होता. त्यांच्या काळात नेपाळच्या नकाशात भारतीय प्रदेश दाखवले गेले. त्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध तणावपूर्ण बनले होते.