राज्याला उद्योगाचे प्रमुख ठिकाण बनवण्यासाठी संघटित व्हा

    दिनांक :21-Jul-2024
Total Views |
- शरद पवार यांचे आवाहन
 
पुणे, 
राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे पुणे शहराचा बाहेरील परिसर औद्योगिक केंद्र म्हणून उदयास आला, याची आठवण करून देतानाच, नागरिकांनी एकजूट होऊन राज्याला व्यापार आणि उद्योगासाठी ‘प्रीमियर डेस्टिनेशन’ बनवण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष Sharad Pawar शरद पवार यांनी केले.
 
 
Sharad Pawar
 
शनिवारी शेजारच्या पिंपरी-चिंचवडमधील पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते. पिंपरी-चिंचवड ऑटोमोबाईल हब म्हणून विकसित झाले आणि त्यानंतर पुणे जिल्ह्यातील हिंजवडी, चाकण आणि इतर भाग आयटी केंद्रे म्हणून उदयास आले. विकास थांबू नये, राज्याला व्यापार आणि उद्योगाचे प्रमुख ठिकाण बनवण्यासाठी आपण एकत्र आले पाहिजे, असे ते म्हणाले.
 
 
आमच्या सरकारने पिंपरी-चिंचवडचा चेहरामोहरा बदलला. हा भाग लहान गावांचा समूह असायचा. आम्ही आयटी क्षेत्र येथे आणले, इथल्या तरुणांना नोकर्‍या दिल्या. आज या राज्याला, देशाला नवी दिशा दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाहीत, असेही पवार म्हणाले. दरम्यान, भाजपासोबत असलेले माधव किन्हाळकर यांनी यावेळी Sharad Pawar शरद पवारांच्या गटात प्रवेश केला. किन्हाळकर हे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारमध्ये 1990 ते 1995 दरम्यान गृह राज्यमंत्री होते. मूळचे काँग्रेसचे नेते असून, त्यांनी नांदेड जिल्ह्यातील भोकरचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे.