लाडकी बहीण अभियान रथयात्रेस प्रारंभ

21 Jul 2024 17:51:16
मानोरा, 
 
 
Washim-Ladki Bahin महाराष्ट्र शासनाने राज्यातील महिलांसाठी सुरू केलेली महत्त्वाकांक्षी माझी लाडकी बहीण योजना जनजागृती रथयात्रेस भारतीय जनता पक्षाचे प्रदेश पदाधिकारी राजू पाटील राजे यांनी शहरात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला. Washim-Ladki Bahin लाडकी बहीण योजना जनसेवा मदत केंद्र, मानोरा येथून आज या अभियान रथयात्रेस प्रारंभ करण्यात आला. शहर व तालुक्यातील ग्रामीण भागातील महिला भगिनींना या योजनेमध्ये सामील होण्यासंदर्भात सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
 

Washim-Ladki Bahin 
 
Washim-Ladki Bahin माझी लाडकी बहीण योजनेमध्ये शहर व तालुक्यातील अधिकाधिक महिला भगिनींनी सहभागी होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून राज्य शासनाकडून देण्यात येणारे मासिक मानधन मिळवून देण्यासाठी आपल्या स्वयंसेवकांकडून मदत उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन यावेळी राजू पाटील राजे यांनी केले. Washim-Ladki Bahin अभियान यावेळी विजय काळे, बंटी डेडुळे, संदीप गडवाले, संतोष उगले, दारासिंग पवार, संतोष जाधव, अरविंद इंगोले, अजय शिंदे, प्रफुल्ल सोनटक्के, अनिल सोनटक्के, डॉ. सुहास देशमुख, मंदार जोशी, अमोल राऊत, अभिषेक चव्हाण, सौरव राठोड़, प्रा. ओम बालौदे, करण गौर, एकनाथ कोल्हे, मिलिंद देशमुख, सुदाम तायड़े, शिवा सावरकर, सुरेश दोनतकर, शाम डोळस, राजू डोंगल, निलेश खुपसे, गोदावरी संतोष जाधव, रमाताई भगत, वंदना भगत यांची उपस्थिती होती.Washim-Ladki Bahin
Powered By Sangraha 9.0