रिसोड,
Washim-agriculture डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित कृषी महाविद्यालय, रिसोड येथील कृषीदूतांनी कृषी अभियांत्रिकी विभागाच्या ग्रामीण कृषि जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत ग्राम व्याड येथील शेतकर्यांना आंतरमशागत व्यवस्थापन करण्यासाठी आधुनिक पद्धतीविषयी विविध साधनांचे प्रात्यक्षिक करून दाखवले. Washim-agriculture त्यावेळी कृषीदूतांनी सायकल कोळपे, पावर टिलर व फवारणी पंपाबद्दल सविस्तर चर्चा करण्यात केली.
यावेळी प्रगतशील शेतकरी जगन्नाथ बोरकर, रघुनाथ बोरकर, अनिल बोरकर, राम बोरकर आणि श्याम बोरकर व आदी शेतकरी उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य ए. एम. अप्तुरकर, उपप्राचार्य पी. जी. देव्हडे, तांत्रिक समन्वयक आर. एस. डवरे, कार्यक्रम समन्वयक डी. डी. मसूडकर, तांत्रिक संयोजक के. एस. देशमुख यांच्यासह विषय तज्ञ मनोज. वि. जाधव यांचे विशेष सहकार्य लाभले.