हे शेत आहे की शेततळं ?

heavy rains-Gondia नुकसानीच्या भरपाईची मागणी

    दिनांक :21-Jul-2024
Total Views |
अर्जुनी मोरगाव,
 
 
heavy rains-Gondia तालुक्यात नवेगावबांध परिसरात मागील आठ दिवसापासून होणार्‍या अतिवृष्टीमुळे रोवणी झालेल्या भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. heavy rains-Gondia तसेच भाजीपाला लागवड करणार्‍या शेतकर्‍यांनाही या अतिवृष्टीचा मोठा फटका बसलेला आहे, या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकर्‍यांना भरपाई द्यावी, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे यांनी शासनाकडे केली आहे. heavy rains-Gondiaमागील चार दिवसातील अतिवृष्टीमुळे नवेगावबांध परिसरातील तलाव व नाल्यातील पाणी शेतकर्‍यांच्या शेतात शिरले आहे.
 
 
heavy rains-Gondia
 
heavy rains-Gondia यात सावरटोला, बोरटोला, चापटी, मुंगली, नवेगावबांध, देवलगाव, सुरगाव, बोंडे, सिरेगाव, भिवखिडकी, बीडटोला, बुरशीटोला, सोमलपूर, कवठा, डोंगरगाव, बाराभाटी, बोळदे आदी गावांतील शेतकर्‍यांच्या धान व भाजीपाला पीकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. heavy rains-Gondia अतिवृष्टीमुळे झालेल्या पीकांचे तातडीने पंचनामे करुन शासनांने शेतकर्‍यांना मदत द्यावी, अशी मागणी किशोर तरोणे यांनी केली आहे.