हिंदू अल्पसंख्य होण्याचा धोका

Hindu-minority-population गठ्ठा मतदान करणारा समाज

    दिनांक :22-Jul-2024
Total Views |
कानोसा 
  
- अमोल पुसदकर
Hindu-minority-population नुकताच जागतिक लोकसंख्या दिवस पार पडला. त्यानिमित्ताने एके ठिकाणी ज्यांना एकच अपत्य आहे अशा पालकांचा सत्कार करण्यात आला व थोरामोठ्यांची याप्रसंगी भाषणेही झाली. या भाषणांमध्ये त्यांनी एकच अपत्य कसं योग्य आहे, यावर आपले विचार मांडले. वक्ते व श्रोते यांनी परस्परांचे कौतुक करून घेतले व अतिशय आनंदी वातावरणात कार्यक्रम पार पडला. Hindu-minority-population दुसरी एक बातमी वाचण्यात आली. त्यामध्ये शरीफा नावाच्या महिलेला १५ वर्षांत १३ मुलं झाली. त्या बातमीच्या खाली लिहिले होते, ‘हिंदूंनो, तुम्ही फक्त इन्कम टॅक्स भरा.' स्वातंत्र्यापासून मागच्या ७५ वर्षांमध्ये हिंदूंची लोकसंख्या ३६ कोटींवरून १०९ कोटी झाली. म्हणजे तिप्पट झाली. मुसलमानांची लोकसंख्या अडीच कोटींवरून २० कोटी झाली म्हणजे सहा पट झाली. Hindu-minority-population ख्रिश्चनांची लोकसंख्या ८० लाखांवरून तीन कोटी झाली म्हणजे त्यांची पण तिप्पट झाली. मागील जनगणनेच्या वेळेसचा एक प्रसंग आठवतो. एक तरुण जनगणना अधिकारी जनगणना करीत एका विशिष्ट धर्माच्या वस्तीमध्ये जनगणना करीत फिरत होता.
 
 

Hindu-minority-population 
 
 
Hindu-minority-population बाहेर बसलेल्या एका म्हाताऱ्याशी त्याने संवाद साधला व त्याची माहिती लिहून घेत त्याला विचारले की, ‘‘तुला किती मुले आहेत.'' त्यावर तो म्हातारा म्हणाला की, ‘‘मला १४ मुले आहे.'' हे ऐकल्यावर या तरुण मुलाला हसू आले. तो वृद्ध त्याला हसताना पाहून म्हणाला, ‘‘तुम्ही आज हसून घ्या. एक दिवस या देशात आम्ही बहुसंख्य होऊ, मग तुम्हाला सांगू.'' आपण शेकडो वर्षे इंग्रजांच्या आधी मुघलांचा काळ बघितलेला आहे. त्यांचे अत्याचार, धर्मांतरण, महिलांवरील अत्याचार हा सर्व इतिहास आपण बघितला आहे. मोठ्या मुश्किलीने त्यातून आम्ही कशीबशी सुटका केली आहे. Hindu-minority-population या वेळच्या निवडणुकीतसुद्धा गठ्ठा मतदानाचा फटका अनेक ठिकाणी बसलेला आहे. पूर्वीच्या काळी आपला धर्मबांधव उभा आहे, असे पाहून त्याला मतदान केले जायचे; परंतु आता भाजपाला जो हरवू शकतो त्याला मतदान केले जात आहे. करोडो लोकांचा अशिक्षित समाज अतिशय सुनियोजितपणे काम करतो आहे, याकडे पाहून हिंदूंनी बोध घेण्याची आवश्यकता आहे. Hindu-minority-population एकीकडे सुनियोजितपणे गठ्ठा मतदान करणारा समाज व दुसरीकडे जाती-पातीच्या राजकारणामध्ये मग्न झालेला हिंदू समाज असे चित्र आहे.
 
 
 
 
असेच सुरू राहिले तर भविष्यात आम्ही आपला पंतप्रधानसुद्धा स्वतः ठरवू शकणार नाही. निवडणुकीच्या आधी काही राजकीय पक्ष समोर येतील.हिंदूंना पुन्हा एकदा जाती-पातीमध्ये व्यस्त करून टाकतील व निवडणूक जिंकून मोकळे होतील. Hindu-minority-population एकीकडे बहुसंख्य होण्याचे स्वप्न पाहिले जात आहे. दिल्लीवर राज्य करण्याचे स्वप्न पाहिले जात आहे तर दुसरीकडे एक अपत्य कसे चांगले आहे, याचे गोडवे गायले जात आहे. समाज म्हणून किती मोठा विरोधाभास आहे हा. लोकसंख्या वाढल्यामुळे निसर्ग, पर्यावरण, साधन, सामग्री, अन्नधान्य या सर्वांचा तुटवडा निर्माण होऊ शकतो, असा तर्क दिला जातो. परंतु केवळ हिंदूंचीच लोकसंख्या वाढल्यामुळे हा तुटवडा निर्माण होईल का? किंवा हिंदूंची लोकसंख्या वाढली नाही म्हणून हा तुटवडा निर्माण होणार नाही का? इतर धर्मीयांची लोकसंख्या जर सहा पट होत आहे तर हा तुटवडा निर्माण होऊ शकतोच. काही लोक म्हणतील ते जसे वागतात तसे आपण वागलेच पाहिजे का? Hindu-minority-population जगाची व्यवस्था ‘बळी तो कानपिळी' ही आहे. आजही ज्या भागांमध्ये विशिष्ट धर्मीय मोठ्या प्रमाणावर आहे तेथे गणपती व दुर्गादेवीच्या मिरवणुकीवर दगडफेक केली जाते. दंगे नेहमीच होत राहतात.
 
 
 
कट्टरवादी लोकांची संख्या वाढणे हे जगाच्या शांततेलाच धोकादायक आहे. आपण तर भारतात राहतो. आपलेही जीवन यामुळे धोक्यात येऊ शकते. आपली मुले, नातू यांना या सर्व गोष्टींचा त्रास सहन करावा लागू शकतो. हिंदूंना दोन मुले जरी असली, तरी कट्टरवादी बहुसंख्य होण्याचा धोका अजून लांबणीवर नक्कीच जाईल. Hindu-minority-population नुकताच अलाहाबाद उच्च न्यायालयाने याबाबत एक निर्णय दिला व त्यावर टिप्पणी करताना सांगितले की, भारतामध्ये बहुसंख्य समाजाचे धर्मांतरण करण्याचे जे प्रयत्न इतर अqहदू धर्मीयांकडून सुरू आहेत, त्यामुळे एक दिवस हा बहुसंख्य समाज अल्पसंख्य झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे अशा पद्धतीच्या प्रयत्नांना थांबविणे गरजेचे आहे. म्हणजे न्यायालय त्यांचा विषय नसताना यावर चिंता  व्यक्त करीत आहे. Hindu-minority-population ‘रिलीजिअस डेमोग्राफी ऑफ इंडिया' या सरकारी विभागाने बहुसंख्य समाज भविष्यात अल्पसंख्य होऊ शकतो, हा धोका वर्तविला आहे. अल्पसंख्यक समाज हा मुलांची संख्या ही केवळ त्यांचे धार्मिक धोरण म्हणून वाढवीत आहे.
 
 
 
ते समाज म्हणून विचार करत आहे व हिंदू, व्यक्ती म्हणून विचार करीत आहे. हा दोघांमधला खूप मोठा फरक आहे.
भारतातील उच्चशिक्षित लोक मुलांबाबत कसा विचार करतात याचे एक धक्कादायक उदाहरण समोर आले आहे. ‘झिरोदा' या कंपनीचे मालक निखिल कामत म्हणाले की, मुलांच्या संगोपनामध्ये माझ्या जीवनातले १८-२० वर्षे मी खर्च करू शकत नाही. मला मूल मुक्त (चाईल्ड फ्री) राहायला आवडेल. Hindu-minority-population मुलांना मोठे करा व एके दिवशी ते तुम्हाला सोडून निघून गेले तर काय करणार, असे ते म्हणाले. निखिल कामत यांनी हिंदू धर्माचे ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ व संन्यास हे चार आश्रम समजून घेण्याची आवश्यकता आहे. म्हणजे त्यांना असे प्रश्न पडणार नाहीत. अशा पद्धतीचे शिकले-सवरलेले अब्जोपती लोक जर असे बोलू लागले व वागू लागले तर तरुण पिढीसमोर कोणता संदेश जाईल, याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे.
 
 
 
एकीकडे जिहाद म्हणून मुलांची संख्या वाढविणारा समाज तर दुसरीकडे चाईल्ड फ्री जीवन जगायला निघालेले लोक किंवा एकच अपत्य पुरे म्हणणारे लोक यामुळे भारतासमोर भविष्यात धार्मिक लोकसंख्या असंतुलन व त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या उद्भवतील, हे लक्षात घेतले पाहिजे. Hindu-minority-population आम्ही असू तर आमचा धर्म, संस्कृती, इतिहास हे सर्व टिकेल. ख्रिश्चन लोक संपूर्ण जगभर गेले व त्यांनी आपल्या धर्माचा प्रचार केला. इस्लामने जगभरामध्ये त्यांच्या धर्माचा प्रचार केला. धर्माचा प्रचार होणे ही तर दूरची गोष्ट आहे, परंतु किमान आमचा धर्म टिकला पाहिजे यासाठी चाईल्ड फ्री किंवा एकच अपत्य मानसिकता टाकून देणे आवश्यक आहे.