नवी दिल्ली,
IND vs SL भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेविरुद्ध 3 टी20 आणि 3 ओडीआय सामन्यांची क्रिकेट मालिका खेळण्यासाठी कोलंबोला रवाना झाला आहे. टीम इंडियाचे नवे प्रशिक्षक गौतम गंभीर हेही टीमसोबत श्रीलंकेला रवाना झाले आहेत. टीम इंडिया 27 जुलैपासून श्रीलंकेविरुद्ध 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. टी-20 क्रिकेट मालिकेची कमान नवीन कर्णधार सूर्य कुमार यादवच्या हाती असेल. श्रीलंकेला रवाना होण्यापूर्वी प्रशिक्षक गौतम गंभीर खूपच उत्साहित दिसत आहेत.
टी20 संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत आणि संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज आणि खलील अहमद.
हेही वाचा : पंतप्रधान मोदींनी एक दिवस आधीच सांगितल यंदाचा अर्थसंकल्प एकदिवसीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल आणि ऋषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रायन पराग, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि खलील अहमद
हेही वाचा : मोहम्मद शमीच्या पुनरागमनावर आगरकरांनी दिले मोठे अपडेट