उत्तरप्रदेशात दोन बसची धडक; 3 ठार, 49 जखमी

    दिनांक :22-Jul-2024
Total Views |
रामपूर, 
UP-ACCIDENT : उत्तरप्रदेशातील रामपूरमध्ये दिल्ली-बरेली महामार्गावर सोमवारी पहाटे राज्य बस व खाजगी बस यांच्यात झालेल्या धडकेत तीन जणांचा मृत्यू व सुमारे 49 प्रवासी जखमी झाले. दिल्ली-बरेली राष्ट्रीय महामार्गावर कावड यात्रा मार्गावर हा अपघात झाला. खाजगी बस हरिद्वारहून श्रावस्ती जिल्ह्याकडे जात होती, तर उत्तरप्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस बरेलीहून दिल्लीला जात होती. दोघांची समोरासमोर टक्कर झाली, असे पोलिसांनी सांगितले.
 
 
UP-ACCIDENT
 
UP-ACCIDENT : पहाटे 4 वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. यात बस चालकासह तीन जणांचा मृत्यू आणि 49 जण जखमी झाले, असे जिल्हा दंडाधिकारी जोगिंदर सिंग यांनी सांगितले. सर्व जखमींना मिलक येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, तेथून नऊ जणांना जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.