तैसे श्रीगुरूचे महिमान!

Guru Purnima 2024 तैसे श्रीगुरुचे महिमान...

    दिनांक :24-Jul-2024
Total Views |
धर्म-संस्कृती 
 
- प्रा. दिलीप जोशी
 
Guru Purnima 2024 संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींनी भावार्थदीपिकेत अर्थात ग्रंथराज ‘ज्ञानेश्वरी'मध्ये आपल्या सद्गुरूंची भरभरून स्तुती केली आहे. हेही वाचा : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारत चमकेल!
जयांचे केलिया स्मरण । होय सकल विद्यांचे अधिकरण । Guru Purnima 2024
तेची वंदू मियां श्रीगुरु चरण । ते नमस्कारोनी आता ।।
सद्गुरूंच्या केवळ स्मरणमात्रे सकळ विद्यांचा अधिकार प्राप्त होतो, हे माउलींनी १३ व्या अध्यायात म्हटले आहे. १० व्या अध्यायात तर माउलींनी खूप गोड गुणगान आपल्या गुरुरायांचे केले आहे.Guru Purnima 2024
नमो विशदबोध विद्ग्धा । विद्यारविंद प्रबोधा ।
परा प्रमेय प्रमदा । विलासिया ।।
कोणताही गुरू विशद बोध विद्ग्ध हवा. म्हणजे विशद करून सांगणारा अर्थात स्पष्ट करण्यात चतुर. महाकवी कालिदासांनी ‘मालविकाग्नी मित्र'मध्ये शिक्षकाची व्याख्या सुंदर शब्दात केली. हेही वाचा : महाराष्ट्र, गुजरात, यूपीसह 9 राज्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट
श्लिष्टाक्रिया कस्य चिदात्म संस्था ।
संक्रांतिर्अन्यस्य विशेष युक्ता ।
यस्योभयं साधू स शिक्षकानां ।। Guru Purnima 2024
 
 
 
Guru Purnima 2024
 
 
Guru Purnima 2024 प्रचंड ज्ञान आणि ते इतरात संक्रमित करण्याची क्षमता ही गुरूमध्ये असलीच पाहिजे. जेणेकरून अंतरंगात बदल होईल. गुरुमाउली आपल्या शिष्याला अंतर्बाहय आंघोळ घालतात, असा त्याचा अर्थ आहे. Guru Purnima 2024 नारदांनी वाल्याचा वाल्मीकि, भगवान बुद्धांनी अंगुलिमाल किंवा ज्ञानेश्वरांनी चांगदेवाला केलेला उपदेश हा विशदबोध होता. निवृत्तिनाथांनी माउलींना केलेला उपदेश अंतरंगाचे सौंदर्य वाढविणारा होता. Guru Purnima 2024 गुरू विद्यारवींद प्रबोध आहेत म्हणजे विद्येचं कमळ विकसित करणारे. इथे विकासात्मक उकल अपेक्षित आहे. संत नामदेवांना देव भेटूनच होता, पण तरीही विसोबांनी उपदेश करून विकासात्मक उकल केली. ती उकल महत्त्वाची. ते सामर्थ्य  देवाजवळही नाही ते केवळ सद्गुरूंचेच. ‘परा प्रमेय प्रमदा विलासिया' म्हणजे अप्रकट ज्ञान, अंतरंग शक्ती, आत्मज्ञान, स्वरूप अवस्थेची जाणीव देणारे ते सद्गुरू.
नमो संसारतम सूर्या । अपरिमित परमवीर्या ।
तरुणतर तुर्या । लालन लीला ।।
संसाररूपी अंधारात ज्ञानरूपी सूर्य असलेले, अगाध सामर्थ्यअसलेले ते सद्गुरू. एका आचमनात सागर पिऊन टाकणारे अगस्ती साक्षात प्रभू रामचंद्रांचे तरुणतर तुर्य ठरतात. Guru Purnima 2024
नमो जगदअखिल पालना । मंगळमणी निधना ।
सज्जनवन चंदना । आराध्य लिंगा ।।
सद्गुरू म्हणजे अखिल जगताचे पालन करणारे, कल्याणरूपी रत्नांची खाण, भक्तिप्रेम वनातील चंदनासम असणारे, पूजा करण्यास योग्य असे पूजनीय म्हणजे सद्गुरू! संत ज्ञानेश्वर माउलींनी सद्गुरुरायांना भरभरून शब्दसुमनांची ओंजळ संपूर्ण ज्ञानेश्वरीतून वाहिली आहे. शहाण्या चित्तरूपी चकोर असणाऱ्यास आनंद देणारे चंद्र म्हणजे सद्गुरू, आत्मानुभूती देणारे राजे, वेदाचा सागर आणि मन्मथ मन्मथा म्हणजे मदनाला भस्म करणारे सद्गुरू होय.Guru Purnima 2024
 
 
 
 
शुद्ध भावाने ज्यांचं भजन करावं आणि सर्व सुखं प्राप्त व्हावीत, असे अधिकारी, भजन करण्यास योग्य, संसाररूपी हत्तीचे गंडस्थळ फोडणारे आणि विश्वाचे उत्पत्ती स्थान म्हणजे सद्गुरू, अशा शब्दात माउलींनी गुरुरायाचे वर्णन केले आहे.
आपुलीया स्नेहाचिया वागिश्वरी । जरी मुकेयाते अंगीकारी ।
ते वाचस्पतीशी करी । प्रबंधु होडा ।।
सद्गुरुरायांचे प्रेम म्हणजेच सरस्वती आहे. हा स्नेह प्राप्त झाला तर मुक्यालाही साक्षात वाचस्पती म्हणजे बृहस्पतीशी चर्चा करण्याचे सामर्थ्य  प्रदान होते. गुरुचरित्रात अशा कथा आहेत. Guru Purnima 2024
मुकं करोति वाचालं, पंगुं लंघयते गिरिं ।
हे सद्गुरूचे सामर्थ्य आहे. माउलींनी दहाव्या अध्यायात केलेलं गुरुरायाचे वर्णन वाचताना दिव्यानुभूती येते.
हे असो दिठी जयावरी झळके । की हा पद्मकरू माथा पारुखे ।
तो जिवची जणू तुके । महेशेशी ।।
सद्गुरुरायांची केवळ कृपादृष्टी जरी पडली किंवा त्यांचा ‘पद्मकरू' म्हणजे हात मस्तकावरून फिरला तर तो जीव शिवस्वरूप होतो. या पुढील सद्गुरुरायांचं वर्णन तर अलौकिक आहे. ते म्हणतात-
एव्हढे जिये महिमेचे करणे । ते वाचाबळे वाणू मी कवणे ।
कां सूर्याचिया अंगा उटणे । लागत असे?।।
 Guru Purnima 2024
 
 
माउली म्हणतात- सद्गुरुरायांचे सामर्थ्य मला वाचाबळाने वर्णन करता येईल का? सूर्याच्या अंगाला उटणे लावण्यासारखे आहे हे. पुढे तर दृष्टांत आणि शब्दरचना थक्क करणारी आहे. ते म्हणतात-
केवुता कल्पतरूवरी फुलौरा?। कायसेनु पाहुणेरु क्षीरसागर?।
कवणेवासी कापुरा सुवासू लागे? चंदनाते कायसेनी चर्चावे?।
अमृताते केवूते रांधावे? गगनावरी उभवावे घडे केवी?।।
सद्गुरुरायांचे वर्णन करताना माउलींच्या शब्दांतील नाद, माधुर्य आणि ओज या तिन्ही शब्दशक्ती आणि शब्दसिद्धी ओसंडून वाहताना दिसतात. वरील ओवीत ते म्हणतात- सद्गुरुरायांचे वर्णन करणे माझे सामर्थ्य नाही. Guru Purnima 2024 कल्पतरूला फुलौरा अपेक्षित आहे का? अहो, क्षीरसागराला पाहुणचार घालता येईल का? किंवा कापराला बाहेरून सुवास देता येईल? चंदनाला चर्चन ऊटी करता येईल? अमृताचे पक्वान्न करून त्यापेक्षा उत्तम काढता येईल? किंवा आकाशाला खांब लावून मांडव घालता येईल? हे सारं जसं अशक्य तसेच सद्गुरूंचे वर्णन शब्दात मांडणे अशक्य आहे. म्हणूनच Guru Purnima 2024
तैसे श्रीगुरुचे महिमान । आकळीते असे साधन ।
ते जाणोनी मियां नमन । निवांत केले ।।
 
 
 
त्यामुळेच श्रीगुरूचा महिमा आकलन होईल, असे साधन अशक्य आहे. म्हणूनच मी निवांत होऊन केवळ नमस्कार त्यांच्या चरणांवर करतो. ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवीमध्ये नऊ हजार ओव्या आहेत. त्यात साडेचार हजार दृष्टांत आहेत. या नऊ हजार ओव्यांत माउलींनी जवळ जवळ हजार ओव्या आपल्या गुरुमाउलीच्या स्तुतीसाठी योजिल्या आहेत.
आपले मोठे भाऊ संत निवृत्तिनाथ हे त्यांचे गुरू.Guru Purnima 2024
गहनि प्रसादे निवृत्ती दातार । ज्ञानदेवा सार चोजविले ।।
‘चोजविने' म्हणजे चिमणी आपल्या पिलांना जसे सर्व तयार अन्न चोचीने भरवते तसेच निवृत्तिनाथांनी माउलींना हे ज्ञान चोजविले.
ज्ञान गूढ गम्य, ज्ञानदेवा लाधले ।
निवृत्तीने दिधले माझे हाती ।।
किंवा 
ते मिया गुरुकृपा नमिले, आदिबीज ।।
किंवा 
ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण ।
दिधले संपूर्ण माझे हाती ।।
 
 Guru Purnima 2024
अशा अनेक ओव्यांमधून ज्ञानेश्वर माउलींनी सद्गुरूंचे वर्णन आणि स्तुती केली आहे. सारी ग्रंथसंपदा, तत्त्वज्ञान हा सद्गुरूंच्या कृपेचा प्रसाद असं माउली मानतात. निवृत्तिनाथांचा अधिकार प्रचंडच आहे. नाथ संकेतीचा दंशु आणि अद्वैत वैष्णव याची सांगड त्यांच्या जीवनात दिसते. माउलींना हे सहजें ब्रह्मरसाचे पारणे ही सिद्धानुभूती निवृत्तिनाथांनी घास भरवावा तशी भरवली. ज्ञानदेवांच्या दृष्टीने निवृत्तिनाथ म्हणजे-
माउलिहुनि मयाळ । चन्द्राहुनि शीतळ ।
पाण्याहुनि पातळ । कल्लोळ प्रेमाचा ।।
९८२२२६२७३५