शेतकर्‍यांचा वाचणार वेळ व पैसा !

    दिनांक :24-Jul-2024
Total Views |
मानोरा, 
शेती कामाकरिताpower weider farmers लागणारे अवजारासह बियाणे, खत,औषधी ई. करिता लागणारे पाणी यासह इतर जड वस्तू शेतामध्ये नेणे कठीण असल्याने पावर रीडरवर जुगाड पद्धतीने मालवाहू ट्राली बनविल्याने शेती सुकर होण्याची किमया राज्य शासन पुरस्कृत अजय ढोक व वेल्डिंग वर्कशॉप चे मालक हितेश ढोरे यांनी केली.
 
 

rtrt 
सध्याच्या युगामध्ये शेती power weider farmersकरण्याकरिता कोणताही युवक तयार नसून हीच परिस्थिती महिलांमध्ये सुद्धा दिसत आहे. अशा मध्ये शेती करणे फार अवघड झाली असल्याने आपल्या शेतीमध्ये आपणच यंत्राच्या साह्याने शेती करून आपले उत्पन्न वाढविण्याकरिता धडपडत असणारे राज्य शासन पुरस्कृत अजय ढोक व पूजा ढोक यांना पावर विडर हे शेतीमधील काम करण्याकरिता यंत्र मिळाले होते. उपरोक्त यंत्राने शेती नांगरणे, वखरणे, कल्टीवेटर करणे आदी करिता वेगवेगळ्या यंत्राच्या आधारे शेती करावी लागते.
 
पेरणी power weider farmersकरिता बियाणे,खत आदीचे नेण्याकरिता पावर विडरवर जुगाड पद्धतीने मालवाहू ट्राली बनविल्याने शेतामधे लागणार्‍या अवजारासह तीन ते चार क्विंटल पर्यंतचे ओझे घेऊन जाणे सोपे झाले आहे.या सोबतच वेळ प्रसंगी आठ ते दहा मजुरांना शेतामध्ये कामा करिता ने -आण करण्याकरिता सुद्धा उपयोगी पडू शकते. यामध्ये शेतकर्‍यांचा बराच वेळ व पैसा सुद्धा वाचेल असे शेतकरी वर्गामध्ये चर्चिले जात आहे. हे यंत्र पाहण्याकरिता परिसरातील अनेक शेतकरी अजय ढोक व हितेश ढोरे यांच्याकडे संपर्क करीत आहे.