आधी आईसाठी चामड्याचे जोडे नंतर शिवलिंगावर रक्ताभिषेक...उज्जैनमध्ये दिसली जगावेगळी पुत्रभक्ती !
24 Jul 2024 12:45:15
उज्जैन,
शिवलिंगाला रक्तानेraktabhishek on shivling अभिषेक, मांडीच्या कातडीपासून पहिल्यांदा आईसाठी चप्पल बनवली, उज्जैनमध्ये अनोखी घटना. शिवमंदिरात २१ पंडितांनी मंत्रोच्चारांसह शिवलिंगाचा रक्ताभिषेक केला. या अद्वितीय समर्पित भक्ताने आधीच आपल्या मांडीच्या कातडीपासून चरण पादुका बनवून मातेला घातल्या होत्या. महाकालची नगरी उज्जैनमध्ये एक अनोखी घटना समोर आली आहे. श्रावण महिन्यात एका भक्ताने आपल्या रक्ताने शिवलिंगाला अभिषेक केला.
रक्ताभिषेक करणारा भक्त नुकताच आपल्या मांडीच्या कातडीपासून आईसाठी चरणपादुका बनवून प्रसिद्धीझोतात आला होता. नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये उज्जैनचा रहिवासी रौनक गुर्जर नावाचा व्यक्ती शिवलिंगावर रक्ताचा अभिषेक करताना दिसत आहे. त्यासाठी रौनकच्या हातातून ठिबकद्वारे रक्त काढण्यात आले. बिलकेश्वर महादेव मंदिरात २१ पंडितांच्या उपस्थितीत रौनक गुर्जर यांनी हा अभिषेक केला. रक्ताने अभिषेक करणाऱ्या भक्ताने असा युक्तिवाद केला की रावणाने त्याचे डोके देखील कापले आणि ते भगवान शिवाला समर्पित केले.याबाबत महाकाल मंदिराचे पुजारी लोकेंद्र व्यास सांगतात की, वैदिक परंपरेनुसार भगवान शिवाला सात्विक गोष्टींनी (दूध, दही, तूप इ.) अभिषेक केला जातो, परंतु रक्तासारख्या गोष्टी तामसिक असतात, त्यामुळे रक्ताचा अभिषेक केला जाणे पूर्ण चुकीचे नाही. हेही वाचा :६ तासांचा थरार...सावंगीत गोठ्यात घुसला बिबट्या