मोठी बातमी ! डोनाल्ड ट्रम्प यांचा जीव यूएफओने वाचवला ?

25 Jul 2024 15:47:25
वॉशिंग्टन, 
अमेरिकेचे माजी Donald Trump Attackराष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर नुकत्याच झालेल्या हल्ल्याबाबत एक नवीन सिद्धांत समोर आला आहे. एलियन्सच्या हल्ल्यातून ट्रम्प बचावले असल्याचे सांगण्यात येत आहे. हा सिद्धांत पेनसिल्व्हेनियाच्या रॅलीच्या व्हिडिओमधून समोर आला आहे ज्यामध्ये युफओ सारखी वस्तू दिसत आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पेनसिल्व्हेनिया येथील रॅलीदरम्यान जीवघेणा हल्ला करण्यात आला, ज्यात ते थोडक्यात बचावले. आता याबाबत एलियन थिअरी समोर आली आहे.
 

rtryt 
हल्ल्याच्याDonald Trump Attack दिवशी 13 एप्रिल रोजी पेनसिल्व्हेनियामधील रॅलीचे व्हिडिओ फुटेज समोर आले आहे ज्यामध्ये यूएफओ सारख्या वस्तू आकाशात उडताना दिसत आहेत. यासंबंधीचा नवा सिद्धांत असा आहे की एलियन्सने ट्रम्प यांचे प्राण वाचवले आहेत. व्हिडिओमध्ये दिसत आहे की ट्रम्प यांच्यावर गोळी झाडण्याच्या काही वेळापूर्वी एक डिस्कसारखी वस्तू हवेत उडणाऱ्या अमेरिकन ध्वजभोवती फिरत होती.सीक्रेट सर्व्हिसचे लोक ट्रम्प यांना वाचवण्यासाठी स्टेजवर पोहोचताच तिथे आणखी एक वस्तू दिसली. 'ट्रम्पच्या रॅलींमध्ये नेहमी UFOs असतात' सोशल मीडिया वापरकर्ते हवेत दिसणाऱ्या युफओ ला 'गार्डियन एंजल्स' म्हणत आहेत. यूएफओने ट्रम्प यांना गोळ्यांपासून वाचवले असे त्यांचे म्हणणे आहे. ट्रम्प यांनीही हल्ल्यापासून काही दिवसांनी देवाने वाचवल्याचे सांगितले होते. हवेत उडणाऱ्या वस्तू ड्रोन असू शकतात, परंतु काही अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की ट्रम्प यांना सुरक्षा पुरवणारी गुप्त सेवा संस्था त्यावेळी कोणत्याही प्रकारचे ड्रोन वापरत नव्हती.
Powered By Sangraha 9.0