करदात्यांच्या सुविधेसाठी आयकर कायद्याचा आढावा घेणार

25 Jul 2024 18:22:55
नवी दिल्ली, 
Income Tax Act : आयकर कायदा सोपा आणि साधा व्हावा तसेच नवीन प्रकि‘येशी जुळवून घेणारा असावा, यासाठी अर्थसंकल्पात त्याचा आढावा घेण्याबाबत घोषणा करण्यात आली, असे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ अर्थात् सीबीडीटीचे अध्यक्ष रवी अग्रवाल यांनी सांगितले.
 
 
tax
 
 
1922 मध्ये अस्तित्वात आलेल्या या कायद्यात 298 कलमे, 23 प्रकरणे आणि 1961 मधील इतर तरतुदी सध्या आहेत. बदलत्या काळात यातील काही भाग अनावश्यक झाला आहे तसेच हा मोठा झाला, असे वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत रवी अग‘वाल यांनी सांगितले. आयकर कायदा हा सोपा नाही, असे करदात्यांनाही वाटते. तो अवघड आहे. त्यामुळे तो समजायला सोपा, सरळ, साधा करण्याचा प्रयत्न आहे.
 
 
हा कायदा सोपा कसा करता येईल आणि करदात्यांसा सुलभता कशी मिळेल, या दिशेने आम्ही काम करीत असल्याचे अग‘वाल यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0