रस्त्याची दयनीय अवस्था

25 Jul 2024 18:48:22
तहसीलदार यांना निवेदन
मानोरा, 
पोहरादेवी ग्रामmuddy roads पंचायतच्या हद्दीत असलेल्या नागरी वस्तीत जगदंबा माता मंदिराकडे जाणार्‍या रस्त्याची पावसाळ्यात दयनीय अवस्था झालेली आहे. सदर रस्त्यावर पावसाने चिखल साचल्यामुळे ये जा करतांना नागरीकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
 

fgfg 
रस्त्यावर मुरूम muddy roadsटाकून रस्ता दुरुस्त करण्यात यावा, अशी मागणीचे निवेदन तहसीलदार डॉ संतोष येवलीकर यांना निकेश राठोड महाराज यांनी दिले आहे. निवेदनात नमूद केले आहे की, ग्राम पंचायत पोहरादेवी हद्दीत येत असलेला नागरी वस्तीमधील जगदंबा माता मंदिराकडे जाणारा रस्ता पाण्याच्या चिखलाने खराब झालेला आहे.
 
सदरील खराब muddy roadsझालेल्या रस्त्यावरून ये जा करतांना नागरीकांना त्रास सहन करून घेण्याची पाळी आलेली आहे. सदरील रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर गोलू राठोड महाराज, धनराज राठोड महाराज आदींच्या स्वाक्षर्‍या आहे.मंदिराकडे जाणारा रस्ता रहदारीचा असल्यामुळे भाविक भक्तांना चिखलातून मार्ग काढत दर्शनासाठी जाण्याची पाळी आली आहे. ग्राम पंचायतीने रस्त्यावर मुरूम टाकून रस्ता दुरुस्त करून देण्याची मागणी तहसीलदार यांचेकडे करण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0