पाकिस्तानी क्रिकेटपटूची चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताला विनंती

    दिनांक :26-Jul-2024
Total Views |
नवी दिल्ली,  
Champions Trophy चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 यावेळी पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाणार आहे. यासाठी भारतीय संघाला सध्या तिथं जाणं कठीण वाटतंय. याबाबत बीसीसीआय आणि पीसीबीमध्ये अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. टीम इंडियाने शेवटचा पाकिस्तान दौरा 2008 मध्ये केला होता. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या राजकीय तणावामुळे भारताने एकदाही पाकिस्तानला भेट दिली नाही. भारताने पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळावे यासाठी पीसीबीने अनेकदा प्रयत्न केले, पण भारताने एकदाही आपली भूमिका बदलली नाही.
 

Champions Trophy 
 
2023 मध्ये झालेल्या आशिया चषकादरम्यानही टीम इंडियाने आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळले. दरम्यान, पाकिस्तानच्या एका अष्टपैलू खेळाडूने भारतीय संघाला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात येण्याची विनंती केली आहे. Champions Trophy पाकिस्तानचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू शोएब मलिकने भारतीय क्रिकेट संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे. मलिक यांचे मत आहे की राजकारण खेळापासून दूर ठेवले पाहिजे आणि भारत आणि पाकिस्तानमधील कोणताही द्विपक्षीय प्रश्न त्यांच्या क्रिकेटशी संबंधित कार्यक्रमांपासून वेगळे सोडवला जावा असे सुचवून या मुद्द्यावर जोर दिला.
मलिक यांनी क्रिकेट पाकिस्तानला सांगितले की, दोन्ही देशांमध्ये जे काही मतभेद आहेत, ते एक वेगळे मुद्दे आहेत आणि वैयक्तिकरित्या सोडवले पाहिजेत. खेळात राजकारण येऊ नये. गेल्या वर्षी पाकिस्तानचा संघ भारतात गेला होता आणि आता भारतीय संघासाठीही ही चांगली संधी आहे. मला वाटते की भारतीय संघात असे अनेक खेळाडू आहेत जे पाकिस्तानमध्ये खेळलेले नाहीत, त्यामुळे त्यांच्यासाठी खूप चांगले होईल. आम्ही खूप चांगले लोक आहोत. आम्ही खूप आदरातिथ्य करणारी माणसं आहोत, त्यामुळे मला खात्री आहे की भारतीय संघ जरूर आलाच पाहिजे.