अरे देवा...उघड्यावर शौच करणाऱ्या व्यक्तीवर अजगरचा हल्ला, VIDEO व्हायरल

    दिनांक :26-Jul-2024
Total Views |
जबलपूर, 
Python attack video सरकारने उघड्यावर शौचास जाणे बंद करण्यासाठी मोहीम सुरू केली आणि प्रत्येक घरात शौचालये बांधण्याची योजना सुरू केली. काहींना उघड्यावर शौचास जाण्याची सवय लागली असली तरी काहींना जाणे भाग पडते! अशीच एक व्यक्ती उघड्यावर शौचास गेल्याने अडचणीत आली. ती व्यक्ती ज्या स्थितीत शौचास बसली होती, त्याच स्थितीत त्याने मदतीसाठी आरडाओरडा केला आणि गावातील लोकांना बोलावले. हेही वाचा : कोल्हापूर, सांगली नद्यांना आले रौद्र रूप...पुराचा धोत का

Python attack video 
हे प्रकरण मध्य प्रदेशातील जबलपूरचे आहे. येथे एक व्यक्ती उघड्यावर शौच करण्यासाठी जंगलात गेली होती. दरम्यान, झुडपात बसलेल्या अजगराने त्यांच्यावर हल्ला केला. अजगराने त्या माणसाला आपला शिकार बनवण्यासाठी पकडले. अजगराने त्या माणसाला इतक्या वेगाने पकडले की तो उठून पळू शकला नाही. Python attack video यानंतर त्या व्यक्तीने गावातील लोकांना हाक मारली. अजगराच्या हल्ल्याचा बळी ठरलेला तरुण जबलपूर जिल्ह्यातील कल्याणपूर गावात लग्नाच्या वरातीसाठी आला होता. गावापासून काही अंतरावर असलेल्या नाल्याच्या झुडपात तो सकाळी शौचास गेला. तो माणूस शौच करत असताना अजगराने त्याच्यावर हल्ला केला, त्याला पकडले आणि गिळण्याचा प्रयत्न केला. त्या माणसाने हिंमत दाखवत अजगराचे तोंड पकडून मदतीसाठी हाक मारली. हेही वाचा : राहुल द्रविडचा मुलगा लीग क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज
गावातील लोक त्याच्याकडे धावले आणि त्यांनी अजगरावर शस्त्रांनी हल्ला केला. अजगर मेल्यानंतर त्या माणसाचा जीव वाचला. एका अजगराने तरुणाला गिळण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेक सोशल मीडिया यूजर्सच्या प्रतिक्रिया येत आहेत.