राहुल द्रविडचा मुलगा लीग क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज

26 Jul 2024 10:31:30
नवी दिल्ली,  
Rahul Dravid son भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक आणि कर्णधार राहुल द्रविड यांचा मुलगा समित द्रविड याला महाराजा ट्रॉफी केएससीए टी20 च्या आगामी हंगामापूर्वी खेळाडूंच्या लिलावादरम्यान म्हैसूर वॉरियर्सने गुरुवारी स्वाक्षरी केली. वॉरियर्सने मधल्या फळीतील फलंदाज आणि वेगवान गोलंदाज समितला 50 हजार रुपयांना विकत घेतले.
हेही वाचा : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची शानदार सुरुवात 
Rahul Dravid son
 
वॉरियर्स संघाच्या अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, “त्याला आमच्या संघात घेणे चांगले आहे कारण त्याने केएससीएसाठी विविध वयोगटातील स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली आहे.” Rahul Dravid son समित द्रविड हा या हंगामात कूचबिहार करंडक जिंकणाऱ्या कर्नाटक अंडर-19 संघाचा भाग होता आणि तो या वर्षाच्या सुरुवातीला लँकेशायर संघाविरुद्ध केएससीए एकादश कडून खेळला आहे. हेही वाचा : 960 वर्ष जुने शिवलिंग पुराच्या पाण्यात बुडाले
Powered By Sangraha 9.0