अद्वितीय भारतीय लष्करात तरुणांनी सामील व्हावे

    दिनांक :26-Jul-2024
Total Views |
-मेजर जनरल (निवृत्त) विजय चौघुले यांचे आवाहन
-कारगिल विजय दिन उत्साहात
-प्रहार समाज जागृती संस्थेचा पुढाकार

नागपूर, 
पॅराशुट रेजिमेंट किंबहुना भारतीय लष्कर जगात अद्वितीय असून जगभरात महत्त्व असलेल्या लष्करात देशसेवेसाठी तरुणांनी मोठ्या सं‘येने सामील व्हायला हवे, असे प्रतिपादन मेजर जनरल (निवृत्त) विजय चौघुले (पीव्हीएसएम, व्हीएसएम) यांनी आज केले.
प्रहार समाज जागृती संस्थेतर्फे कारगिल विजय दिवसाचा 25वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मेजर जनरल (निवृत्त) विजय चौघुले प्रमुख पाहुणे होते. संस्थेच्या सचिव फ्लाईट लेफ्टनंट (निवृत्त) शिवाली देशपांडे यांनी Vijay Chowghule विजय चौघुले यांचा देशासाठी केलेल्या विशिष्ट सेवेबद्दल सन्मानित केले.
 
 
Vijay
 
Vijay Chowghule : आपल्या प्रमुख भाषणात विजय चौघुले यांनी कारगिल विजय दिवस व एकंदरितच भारताचा राष्ट्राभिमान उंचावणार्‍या विविध युद्धजन्य कामगिरींची माहिती दिली. भारतीय लष्कराविषयी सांगताना त्यांनी 6 व्या पॅराशूट रेजिमेंटमधील त्यांचे अनुभव सांगितले. कारगिल युद्धातील या रेजिमेंटचे योगदान, दहशतवादविरोधी मोहीम, मालदिवमधील ओलिसांची सुटका, अपारंपरिक युद्ध आदींच्या गौरवपूर्ण कामगिरींची माहिती त्यांनी दिली. लष्करात सहभागी होण्याच्या विविध मार्गांवर प्रकाश टाकून त्यांनी तरुणांना प्रेरित केले. प्रारंभी हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. कारगिल युद्धातील साहस कथा अविदास हेजीब यांनी सांगितल्या. संचालन प्रियंका यादव व कॅरोल मुकोइल यांनी केले. शिवाली देशपांडे यांनी शेवटी आभार मानले.