सायंटिफिक सभागृहात आज "गजर विठ्ठलाचा"

    दिनांक :27-Jul-2024
Total Views |
नागपूर,
scientific auditorium संस्कृती इव्हेन्टस ,सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारी एक नामवंत संस्था आहे.  आपल्या साठी गायनाचा सुंदर कार्यक्रम  घेऊन येत आहे. मराठी माणसाच्या मनावर संत साहित्याचे, अभंगाचे गारूड आहे. अभंगांचे गायन करणे, श्रवण करणे हा त्यांचा श्रध्देचा विषय आहे. शतकानुशतके ह्या पदांची गोडी अखंड आहे. निवडक अभंगांचा कार्यक्रम "गजर विठ्ठलाचा" ह्या शीर्षकाने आज २७ जुलै रोजी, संध्याकाळी ६.३० वाजता. लक्ष्मीनगर आठ रस्ता चौकातील सायंटिफिक सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
vithal 
 
पियाली बिश्वास यांची संकल्पना असून प्रसिद्ध गायक कलाकार गुणवंत घटवई, डॉ मंजिरी वैद्य अय्यर, मुकुल पांडे, श्रेया खराबे  टांकसाळे रसिकांच्या आवडीच्या संत रचना सादर करतील. scientific auditorium या कार्यक्रमाचे संगीत संयोजक परिमल जोशी असून निवेदन किशोर गलांडे करतील. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून निःशुल्क आहे. सर्वांनी कार्यक्रमाला अवश्य यावे व आस्वाद घ्यावा. अशी विनंती संस्कृती इव्हेंटस्च्या पियाली बिस्वास यांनी केली आहे.
सौजन्य: देवराव प्रधान, संपर्क मित्र